Notes For All Chapters – इतिहास Class 11
दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहमनी राज्य
प्रस्तावना
- भारताच्या इतिहासात प्राचीन कालखंडाचे मध्ययुगात झालेले संक्रमण हे राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत दिसून येते.
- युगांचे परिवर्तन एका ठराविक काळात पूर्णपणे होत नाही; जुन्या परंपरा कायम राहतात आणि नव्या परंपरांचा उदय होतो.
- इतिहासात कालखंडाची विभागणी ही बदलत्या संदर्भांमुळे कठीण असते.
१४.१ भारतातील राजकीय स्थिती
प्राचीन ते मध्ययुगीन संक्रमण:
- प्राचीन काळातील काही राजघराणी मध्ययुगातही कायम होती, तर नव्या सत्तांचा उदय झाला.
- दक्षिणेत चोळांचे राज्य मध्ययुगात साम्राज्यात रूपांतरित झाले. विजयालय या राजाने पांड्य, पल्लवांचा पराभव करून चोळ सत्ता विस्तारली.
- उत्तर भारतात हर्षवर्धनाच्या साम्राज्याच्या ऱ्हासानंतर अनेक छोटी-मोठी राज्ये उदयास आली. यांच्यात सतत सत्तासंघर्ष होता.
- उत्तर भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले नाही.
तेराव्या शतकातील परिस्थिती:
- तुर्की आक्रमकांनी भारताच्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेतला.
- तत्कालीन राजघराणी: चौहान (राजस्थान), प्रतिहार (कनोज), चंदेल (बुंदेलखंड), परमार (माळवा), चालुक्य (गुजरात), पाल (बंगाल) इत्यादी.
- या राजघराण्यांनी तुर्कांचा प्रतिकार केला, पण आपसातील संघर्षामुळे पराभव झाला.
१४.२ अरब आणि तुर्कांचे आक्रमण (सुरुवात)
मुहम्मद घुरी:
- महमूद गझनीनंतर मुहम्मद घुरीने भारतावर आक्रमणे केली.
- उद्देश: संपत्ती लूट आणि भारतात राज्य स्थापना.
- पृथ्वीराज चौहान याने प्रतिकार केला. दोघांमध्ये ‘तराईची युद्धे’ झाली.
- दुसऱ्या तराईच्या युद्धात (इ.स. ११९२) पृथ्वीराजचा पराभव झाला.
- परिणाम: राजपुतांचे एकीकरण करणारे नेतृत्व उरले नाही; घुरीने सिंध ते बंगालपर्यंत तुर्की साम्राज्य स्थापन केले.
- पराभवाची कारणे: एकीचा अभाव, विखुरलेली सत्ता, राष्ट्रभावनेची कमतरता, तुर्कांची कुटील राजनीती आणि आक्रमकता.
- घुरीने कुतुबुद्दीन ऐबक याला दिल्लीचा प्रदेश दिला. घुरीच्या मृत्यूनंतर ऐबक दिल्लीचा पहिला सुलतान (गुलाम घराण्याचा संस्थापक) झाला.
१४.३ अलाउद्दीन खल्जी आणि देवगिरीचे यादव
गुलाम घराण्याचा विकास:
- कुतुबुद्दीन ऐबकनंतर इल्तुतमिश (अल्तमश) सुलतान झाला. त्याने आपली मुलगी रझियाला राज्यकारभाराचे शिक्षण दिले.
- रझिया सुलतान: दिल्लीची पहिली आणि एकमेव महिला सुलतान. कर्तबगार, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष. ती लष्करी मोहिमांचे नेतृत्व करत असे.
- रझियनंतर बल्बन सुलतान झाला. गुलाम घराण्याचा अंत झाल्यावर खल्जी घराण्याचा उदय झाला.
अलाउद्दीन खल्जी:
- अलाउद्दीनने देवगिरीच्या यादवांवर आक्रमण केले. देवगिरी हे संपन्न शहर होते; रामदेवराय यादव हा तिथला राजा.
- पहिले आक्रमण (इ.स. १२९६): अचानक हल्ला, किल्ल्याला वेढा, लूटमार. रामदेवरायाने तह केला; अलाउद्दीनला प्रदेश आणि संपत्ती मिळाली.
- दुसरे आक्रमण (इ.स. १३१२): रामदेवरायाने खंडणी देणे बंद केल्यावर अलाउद्दीनने मलिक काफूरला पाठवले.
- उद्देश: आर्थिक संकट सोडवणे आणि राज्यविस्तार.
- सुधारणा: मोठे कायमस्वरूपी सैन्य उभारले, बाजारभाव नियंत्रणासाठी आर्थिक धोरणे राबवली.
तुघलक घराणे:
- खल्जीनंतर तुघलक घराण्याची सत्ता. मुहम्मद बिन तुघलकची कारकीर्द महत्त्वाची.
- प्रयोग:
- राजधानी स्थलांतर: दिल्लीवरून देवगिरी (दौलताबाद) आणि पुन्हा दिल्लीला. अपयश कारणे: दळणवळणाचा अभाव, व्यापाराची हानी, जनतेची नाखुषी.
- चलन सुधारणा: तांब्याची नाणी पाडली, पण यश मिळाले नाही.
- तैमूरच्या आक्रमणाने (इ.स. १३९८) तुघलक घराणे संपुष्टात आले.
सय्यद आणि लोदी घराणे:
- तुघलकानंतर सय्यद आणि नंतर लोदी घराण्याची सत्ता.
- इब्राहीम लोदी (शेवटचा सुलतान) याच्या स्वभावदोषामुळे शत्रू वाढले.
- पानिपतची पहिली लढाई (इ.स. १५२६): बाबराने इब्राहीमचा पराभव केला; सुलतानशाहीचा अंत आणि मुघल सत्तेची सुरुवात.
१४.४ व्यापार आणि वाणिज k
आर्थिक व्यवस्था:
- शेती हा मुख्य व्यवसाय; महसूल हे राज्याचे प्रमुख उत्पन्न.
- कापड उद्योग मोठा: दिल्ली, आग्रा, लाहोर, बनारस, खंबायत, देवगिरी ही केंद्रे.
- निर्यात: सुती कापड, मलमल, जरीचे कापड (बंगाल, गुजरातमधून).
- इतर उद्योग: धातू, साखर, चर्मोद्योग, कागद निर्मिती (चिंध्या आणि झाडाच्या सालीपासून).
व्यापार:
- अंतर्गत व्यापार वाढला; आठवडी बाजार आणि पेठा उदयास.
- प्रमुख पेठा: दिल्ली, मुलतान, जौनपूर, आग्रा.
- निर्यात वस्तू: कापड, मसाले, साखर, सुंगधी तेल (इराण, अरब, चीनला).
- आयात: घोडे (इराक, तुर्कस्तान), धातू, केशर (मक्का, एडन).
चलन व्यवस्था:
- नाण्यांवर खलिफा/सुलतानांची नावे, अरबी लिपीत तपशील.
- ‘तोळा’ हे वजनाचे प्रमाण प्रचलित.
- अलाउद्दीनने बाजार नियंत्रणासाठी प्रयोग केला: भाव निश्चिती, दुष्काळात धान्य पुरवठा. परिणाम: शेतकऱ्यांची पिळवणूक.
१४.५ शहरीकरण
शहरीकरणाची प्रक्रिया:
- राजकीय आणि आर्थिक विकासाशी जोडलेली.
- राज्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची (इब्न खल्दून).
- दिल्ली: सुलतानांची राजधानी म्हणून उदय.
- अलाउद्दीन खल्जी: ‘सिरी’ शहर.
- तुघलक: ‘तुघलकाबाद’, ‘जहाँपन्हा’, ‘फिरोजाबाद’.
- सय्यद/लोदी: आग्रा राजधानी.
विकास:
- व्यापार आणि दळणवळणाच्या वाढीमुळे शहरांचा विकास.
१४.६ कला, स्थापत्य, साहित्य, समाजजीवन
कला:
- संगीत: रझिया आणि बल्बन यांनी प्रोत्साहन. बल्बनने इराणी-भारतीय रागांची निर्मिती.
- सुफी संतांचा वाटा: कव्वाली लोकप्रिय.
- जौनपूरचा हुसेनशहा: ख्याल गायकी.
स्थापत्य:
- इस्लामी शैली: मशिदी, दर्गे, कबरी.
- कुतुबुद्दीन ऐबक: ‘कुव्वत-इ-इस्लाम’ मशीद, कुतुबमिनार (अल्तमशने पूर्ण).
- अलाउद्दीन: अलाई दरवाजा, जमाअलखान मशीद.
- फिरोजशाह तुघलक: फतहाबाद, हिसार-इ-फीरुझ, किल्ले, पूल.
साहित्य:
- संस्कृत ग्रंथांचे फारसी/अरबीत भाषांतर (अल्बेरूनी).
- प्रसिद्ध साहित्यिक: अमीर खुसरौ, हसन निझामी, झियाउद्दीन बरनी.
- उर्दू भाषेचा उदय.
समाजजीवन:
- मुसलमानी समाज: तुर्क, उलेमा, मुघल, भारतीय मुसलमान.
- शिक्षण: मक्तबा (प्राथमिक शाळा), मदरसे.
१४.७ विजयनगर साम्राज्य
स्थापना:
- हरिहर आणि बुक्क यांनी इ.स. १३३६ मध्ये स्थापना.
- अलाउद्दीन खल्जीच्या आक्रमणांमुळे दक्षिणेत नवे राज्य.
विस्तार:
- कृष्णदेवराय: पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस विशाखापट्टण आणि दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत.
- ‘आमुक्तमाल्यदा’ हा ग्रंथ (राजनीती).
प्रवासवृत्तांत:
- निकोलो काँटी (इटालियन), अब्दूर रझाक (इराणी).
अंत:
- तालिकोटची लढाई (इ.स. १५६५): बहमनी शाह्यांनी पराभव केला.
१४.८ बहमनी राज्य
स्थापना:
- इ.स. १३४७ मध्ये हसन गंगूने (अल्लाउद्दीन बहमतशाह) स्थापना.
- राजधानी: गुलबर्गा.
विकास:
- महमूद गावान (वजीर): सैनिकांना रोख वेतन, महसूल सुधारणा, जमीन मोजणी, मदरसा स्थापना.
विघटन:
- गटबाजीमुळे दुर्बलता.
- पाच शकले: इमादशाही (वऱ्हाड), बरीदशाही (बिदर), आदिलशाही (विजापूर), निजामशाही (अहमदनगर), कुतुबशाही (गोवळकोंडा).
तालिकोटची लढाई:
- विजयनगरचा पराभव आणि अंत.
Leave a Reply