राज्य
लघु प्रश्न
1. राष्ट्र म्हणजे काय?
उत्तर: समान ओळख असलेल्या लोकांचा समूह ज्याला भावनिक एकता असते, त्याला राष्ट्र म्हणतात.
2. राष्ट्रवादाची एक वैशिष्ट्य काय आहे?
उत्तर: राष्ट्रवाद लोकांमध्ये एकता निर्माण करतो.
3. राज्याला काय आवश्यक आहे?
उत्तर: राज्याला सार्वभौमत्व, भूप्रदेश, लोकसंख्या आणि शासनसंस्था आवश्यक आहे.
4. सार्वभौमत्व म्हणजे काय?
उत्तर: देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे सार्वभौमत्व.
5. राष्ट्रगीत कशाशी संबंधित आहे?
उत्तर: राष्ट्रगीत राष्ट्रवादाच्या भावनेशी संबंधित आहे.
6. शासनसंस्था कोणती कार्ये करते?
उत्तर: शासनसंस्था कायदा, सुव्यवस्था आणि जनकल्याणाची कार्ये करते.
7. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम कुठे झाला?
उत्तर: उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम फ्रेंच राज्यक्रांतीत झाला.
8. प्रसारवादी राष्ट्रवाद कसा असतो?
उत्तर: प्रसारवादी राष्ट्रवाद आक्रमक असतो आणि साम्राज्य निर्माण करतो.
9. पॅलेस्टाईन राज्य का नाही?
उत्तर: पॅलेस्टाईनला स्वतंत्र सार्वभौम सरकार नाही म्हणून ते राज्य नाही.
10. राष्ट्र आणि राज्यात काय फरक आहे?
उत्तर: राष्ट्र ही भावनिक एकता आहे, तर राज्याला सार्वभौमत्व आणि शासन असते.
दीर्घ प्रश्न
1.राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
उत्तर: राष्ट्राला लोकसंख्या, सांस्कृतिक समानता आणि भावनिक एकतेची जाणीव असते. या गोष्टींमुळे लोकांना आपण एक आहोत असं वाटतं.
2. राष्ट्रवाद म्हणजे काय आणि त्याचे प्रकार सांगा.
उत्तर: राष्ट्रवाद म्हणजे देशावरील प्रेम आणि एकनिष्ठता. त्याचे प्रकार उदारमतवादी, परंपरावादी, प्रसारवादी आणि वसाहतवादविरोधी असे आहेत.
3. राज्याचे घटक कोणते आहेत?
उत्तर: राज्याला सार्वभौमत्व, शासनसंस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या लागते. हे घटक राज्याला स्वतंत्र आणि मजबूत बनवतात.
4. सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य यात काय फरक आहे?
उत्तर: सार्वभौमत्व म्हणजे कायदेशीर अधिकार, तर स्वातंत्र्य राजकीय स्वरूपाचं आहे. भारत 1950 मध्ये संविधानाने सार्वभौम झाला.
5. शासनसंस्था म्हणजे काय आणि ती काय करते?
उत्तर: शासनसंस्था म्हणजे राज्याचा प्रशासकीय भाग. ती कायदा, धोरण आणि जनकल्याणाची कामं करते.
6. भारत एक राष्ट्र कसं आहे?
उत्तर: भारतात विविधता असूनही सांस्कृतिक आणि ऐतिहासिक समानतेने एकता आहे. ‘विविधतेत एकता’ हे भारतीय राष्ट्रवादाचं वैशिष्ट्य आहे.
7. राष्ट्रवादाचे फायदे आणि तोटे काय आहेत?
उत्तर: प्रागतिक राष्ट्रवाद एकता आणि विकास देतो. आक्रमक राष्ट्रवाद तेढ आणि विनाश घडवतो.
8. भूप्रदेश म्हणजे काय आणि त्याचे घटक काय?
उत्तर: भूप्रदेश म्हणजे राज्याचा निश्चित भौगोलिक प्रदेश. त्यात जमीन, सागरी भाग आणि आकाशाचा समावेश होतो.
9. राज्य आणि शासनसंस्था यात काय फरक आहे?
उत्तर: राज्य ही मोठी आणि कायमस्वरूपी संकल्पना आहे. शासनसंस्था त्याचा भाग असून तात्पुरती बदलते.
10. वसाहतवादविरोधी राष्ट्रवाद कसा निर्माण झाला?
उत्तर: परकीय सत्तेच्या विरोधात स्वातंत्र्याची मागणी झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हा राष्ट्रवाद दिसला.
Leave a Reply