राज्य
स्वाध्याय
प्र.1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
- इंग्रजीतील Nation हा शब्द लॅटिन शब्द Nasci पासून निर्माण झाला आहे. (Nasci, Natio, Natalis, Nauto)
- उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा फ्रेंच राज्यक्रांतीत झाला. (अमेरिकन, रशियन, फ्रेंच, ब्रिटिश)
(ब) चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
(i) ॲरिस्टॉटल – प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ (जर्मन विचारवंत चुकीचे आहे)
(ii) जाँ बोडीन – फ्रेंच विचारवंत
(iii) वूड्रो विल्सन – अमेरिकन विचारवंत
(iv) हॅरॉल्ड लास्की – ब्रिटिश विचारवंत
(क) दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.
- लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती – राष्ट्रवाद
- ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे – अधिकार क्षेत्र
प्र.2 खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
1. प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो.
चूक – कारण प्रागतिक राष्ट्रवाद हा समाजाला एकत्रित करून विकास साधण्याची क्षमता ठेवतो. तेढ निर्माण करणे हे आक्रमक राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आहे, प्रागतिक राष्ट्रवादाचे नाही.
2. सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार.
बरोबर – कारण सार्वभौमत्व म्हणजे राज्याला कोणत्याही बाह्य शक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. हे राज्याच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
3. पॅलेस्टाईन हे राज्य आहे.
चूक – कारण पॅलेस्टाईनकडे स्वतःचे सार्वभौम सरकार नाही आणि त्याचा भूप्रदेश इस्राएलच्या अधिकारक्षेत्रात येतो. त्यामुळे तो एक राष्ट्र आहे, परंतु राज्य नाही. तथापि, संयुक्त राष्ट्रांत त्याला सभासद नसलेला निरीक्षक दर्जा आहे.
4. प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा प्रकार आहे.
बरोबर – कारण प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक स्वरूपाचा असतो आणि राष्ट्रीय गौरवासाठी साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, जसे की वसाहतवादात दिसून येते.
प्र.3 आपले मत नोंदवा.
भारत एक राज्य आहे.
माझ्या मते, भारत एक राज्य आहे कारण त्याच्याकडे राज्याची सर्व वैशिष्ट्ये आहेत. भारताला स्वतःचे सार्वभौमत्व आहे, स्वतंत्र शासनसंस्था आहे, निश्चित भूप्रदेश आहे आणि लोकसंख्या आहे. भारताचे संविधान 1950 मध्ये लागू झाल्यानंतर तो पूर्णपणे सार्वभौम राज्य बनला. त्यामुळे भारत हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे.
प्र.4 पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1.राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
उत्तर – राष्ट्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- लोकसंख्या: राष्ट्राला लोक असणे आवश्यक आहे. या लोकांमध्ये भाषिक, वांशिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक समानता असते, ज्यामुळे त्यांच्यात एकता निर्माण होते.
- सामुदायिक ऐक्याची भावना: लोकांमध्ये सांस्कृतिक समानतेतून आपण एक आहोत ही भावना निर्माण होते. ही भावना मानसिक पातळीवर असते.
- राजकीय वेगळेपण: सामाजिक आणि सांस्कृतिक समानता असलेले लोक एका निश्चित भूप्रदेशात राहतात आणि स्वयंनिर्णयाची मागणी करतात, ज्यामुळे राजकीय वेगळेपणाची भावना निर्माण होते.
2. राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा.
उत्तर –
राष्ट्रवाद म्हणजे काय: राष्ट्रवाद ही एक राजकीय अस्मिता आहे जी लोकांना आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडते. यातून त्यांच्यात स्वतःची ओळख, अभिमान आणि राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते.
राष्ट्रवादाचे प्रकार:
- उदारमतवादी राष्ट्रवाद: हा प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार मानतो. उदा., फ्रेंच राज्यक्रांती.
- परंपरावादी राष्ट्रवाद: हा समाजाला अंतर्मुख करतो आणि स्वदेशाभिमानाला महत्त्व देतो.
- प्रसारवादी राष्ट्रवाद: हा आक्रमक असतो आणि राष्ट्रीय गौरवासाठी साम्राज्य निर्माण करतो. उदा., वसाहतवाद.
- वसाहतवादविरोधी राष्ट्रवाद: हा स्वातंत्र्यलढ्यासाठी असतो. उदा., भारताचा स्वातंत्र्यलढा.
प्र.5 खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा.
राज्याचे खालील घटक स्पष्ट करा:
(अ) सार्वभौमत्व:
उत्तर – सार्वभौमत्व म्हणजे राज्याला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार. हे राज्याचे स्वातंत्र्य दर्शवते. राज्याला स्वतःचे संविधान असते आणि ते कोणत्याही बाह्य शक्तीवर अवलंबून नसते. उदा., भारत 1950 मध्ये संविधान लागू झाल्यानंतर सार्वभौम झाला.
(ब) शासनसंस्था:
उत्तर – शासनसंस्था ही राज्याची प्रशासकीय व्यवस्था असते. ती स्वतंत्र आणि सार्वभौम असते. यात कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांचा समावेश होतो. धोरणनिर्मिती आणि कायद्यांची अंमलबजावणी ही शासनसंस्थेची जबाबदारी असते.
(क) लोकसंख्या:
उत्तर – राज्याला लोक असणे आवश्यक आहे. या लोकांमध्ये भाषिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक विविधता असू शकते. उदा., भारतात अनेक राष्ट्रांचा समावेश आहे, तरीही ते एक राज्य आहे.
(ड) भूप्रदेश:
उत्तर – भूप्रदेश म्हणजे राज्याच्या सीमेअंतर्गत असलेला निश्चित भौगोलिक प्रदेश. यात जमीन, किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल सागरी प्रदेश आणि आकाशाचा भाग समाविष्ट असतो. हा राज्याच्या अधिकार क्षेत्राचा भाग असतो.
Leave a Reply