Important Questions For All Chapters – इतिहास Class 12
युरोपीय वसाहतवाद
लहान प्रश्न
1. वसाहतवाद म्हणजे काय?
उत्तर: सामर्थ्याच्या बळावर एखादा प्रदेश ताब्यात घेऊन राज्य स्थापन करणे.
2. अमेरिकेतील स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला?
उत्तर: थॉमस जेफरसन.
3. स्पेनने दक्षिण अमेरिकेत कोणते प्रदेश ताब्यात घेतले?
उत्तर: मेक्सिको, पेरू, व्हेनेझुएला.
4. बोस्टन टी पार्टी कोणत्या वर्षी घडली?
उत्तर: १७७३ मध्ये.
5. पहिले ब्रह्मी युद्ध कोणी पुकारले?
उत्तर: लॉर्ड ॲमहर्स्ट.
6. ऑस्ट्रेलियामधील पहिली वसाहत कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी होती?
उत्तर: गुन्हेगारांसाठी.
7. इजिप्तमध्ये सुएझ कालवा कोणी बांधला?
उत्तर: फ्रेंच अधिकारी फर्डिनंड दि लेसेप्स.
8. ‘राजाविना राज्य’ ही संकल्पना कोणी जगाला दिली?
उत्तर: अमेरिका.
9. नेपाळमध्ये ब्रिटिश रेसिडेंट कुठे नेमण्यात आला होता?
उत्तर: काठमांडूमध्ये.
10. सिक्कीम भारतात कधी समाविष्ट झाला?
उत्तर: १९७५ मध्ये.
लांब प्रश्न
1. वसाहतवाद म्हणजे काय? त्याचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर: वसाहतवाद म्हणजे एखाद्या बलाढ्य देशाने दुसऱ्या दुर्बल प्रदेशावर सत्ता प्रस्थापित करणे होय. त्यातून स्थानिकांचे शोषण होते. राजकीय, आर्थिक व मानसिक गुलामगिरी होते. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल इ. देशांनी वसाहती स्थापन करून त्यांचे आर्थिक शोषण केले.
2. वसाहतवाद फोफावण्याची कारणे लिहा.
उत्तर: औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज, भांडवलाची गुंतवणूक, खनिज साठे, भौगोलिक स्थान, स्वस्त मजूर, वंशश्रेष्ठत्वाची कल्पना इ. कारणांमुळे वसाहतवाद वाढला.
3. अमेरिकेतील वसाहतवादाचे परिणाम काय झाले?
उत्तर: मूळ रहिवाशांना हुसकावले, त्यांचे राज्य संपले, गुलामगिरी लादली, संपत्तीची लूट झाली, शेती व खाणकामातून स्पेनने नफा कमावला.
4. अमेरिकेचे स्वातंत्र्यलढा कसा घडला?
उत्तर: इंग्लंडच्या निर्बंधांविरुद्ध बंड सुरू झाले. बोस्टन टी पार्टी, स्टँप ॲक्टला विरोध झाला. १७७६ मध्ये थॉमस जेफरसनने स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला. जॉर्ज वॉशिंग्टनने नेतृत्व केले आणि अखेर अमेरिका स्वतंत्र झाली.
5. ब्रिटनने म्यानमारवर कसा कब्जा केला?
उत्तर: तीन ब्रह्मी युद्धांतून इंग्रजांनी म्यानमार जिंकले. नैसर्गिक साधनसंपत्ती, व्यापारासाठी म्यानमार महत्त्वाचा होता. थिबा राजाला रत्नागिरी येथे नजरकैदेत ठेवले गेले.
6. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडवरील वसाहतवाद स्पष्ट करा.
उत्तर: इंग्लंडने गुन्हेगारांसाठी ऑस्ट्रेलियात वसाहत सुरू केली. पुढे स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. न्यूझीलंडला १९०७ मध्ये स्वयंशासन मिळाले. तेथे समाजवादी योजना राबवल्या.
7. सिक्कीम व भूटान यांच्यावर इंग्रजांनी कसे वर्चस्व मिळवले?
उत्तर: सिक्कीमचा काही भाग इंग्रजांनी ताब्यात घेतला व त्याचे अंतर्गत व परराष्ट्र धोरण आपल्या हातात ठेवले. भूटानशी करार करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले.
8. आफ्रिकेतील युरोपीय वसाहतवादाचे स्वरूप सांगा.
उत्तर: बेल्जियम, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल इ. देशांनी आफ्रिकेतील खंड आपसात वाटून घेतले. संपत्ती, गुलाम, खनिज साठे यांचा लुट करण्यात आला.
9. सुएझ कालवा इंग्लंडसाठी का महत्त्वाचा होता?
उत्तर: सुएझ कालवा भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र जोडतो. इंग्लंडने कालवा कंपनीचे समभाग विकत घेऊन त्यावर वर्चस्व मिळवले. व्यापारासाठी हा कालवा अत्यंत महत्त्वाचा होता.
10. वसाहतवादाचे फायदे व तोटे स्पष्ट करा.
उत्तर: तोटे: स्थानिकांचे शोषण, गुलामगिरी, संपत्तीची लूट, आत्मसन्मान नष्ट.
फायदे: लोकशाही, शिक्षण, कायदा, स्वातंत्र्याची जाणीव, आधुनिक विचार यांचा प्रसार झाला.
Leave a Reply