Important Questions For All Chapters – इतिहास Class 12
भारत आणि युरोपीय वसाहतवाद
लहान प्रश्न
1. वास्को-द-गामा भारतात कधी आला?
उत्तर: इ.स. १४९८ मध्ये.
2. ‘कार्ताझ’ म्हणजे काय?
उत्तर: पोर्तुगीज परवानापत्र ज्यात जहाजाचे तपशील असतात.
3. पोर्तुगीजांनी भारतात मुख्य ठिकाण कोणते निवडले?
उत्तर: गोवा.
4. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली?
उत्तर: ३१ डिसेंबर १६०० रोजी.
5. ब्रिटिशांनी चेन्नईत कोणता किल्ला बांधला?
उत्तर: फोर्ट सेंट जॉर्ज.
6. फ्रेंचांनी भारतात कोणते मुख्य ठाणे स्थापन केले?
उत्तर: पाँडिचेरी.
7.डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली?
उत्तर: इ.स. १६०२ मध्ये.
8. पोर्तुगीजांनी ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांवर काय निर्बंध लावले?
उत्तर: धार्मिक स्थळे व उत्सवांवर बंदी घातली.
9. मच्छलीपट्टण येथे कोणत्या देशाची पहिली वखार होती?
उत्तर: डचांची.
10. भारतात फ्रेंचांनी वखार कोठे स्थापन केली?
उत्तर: सुरत येथे (इ.स. १६६८).
लांब प्रश्न
1. भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या?
उत्तर: पोर्तुगीजांनी गोवा, दीव, दमण, चौल, मयिलापूर, नागपट्टणम, कोल्लम, कोडुंगलूर, कन्नूर, कोची, होनावर, बसरूर, मंगलोर, गंगोळी, हुगळी येथे वसाहती स्थापन केल्या.
2. कार्ताझ घेणे भारतीय सत्ताधीशांसाठी का गरजेचे होते?
उत्तर: पोर्तुगीजांनी हिंदी महासागरावर नियंत्रण मिळवल्यामुळे तिथे जहाज पाठवण्यासाठी त्यांच्या परवान्याची आवश्यकता होती. परवाना नसल्यास जहाज बुडवले जाई.
3. पोर्तुगीज सत्तेचा स्थानिक धर्मावर काय परिणाम झाला?
उत्तर: पोर्तुगीजांनी इतर धर्मांवर बंदी घातली, धर्मांतर करणाऱ्यांना नोकऱ्या दिल्या व स्थानिक भाषेची गळचेपी केली.
4. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सुरुवातीचे धोरण काय होते?
उत्तर: मसाल्यांचे खरेदी-विक्री, भारतात वखारी (फॅक्टरी) स्थापणे, किल्ले बांधणे व संरक्षणासाठी सैन्य ठेवणे.
5. ब्रिटिशांनी मुंबई कशी मिळवली आणि तेथे काय केले?
उत्तर: पोर्तुगीज राजकन्या ब्रॅगंझाशी चार्ल्सचा विवाह झाल्यावर मुंबई आंदण मिळाली. कंपनीने तेथे नाणी पाडणे, व्यापाऱ्यांना प्रोत्साहन, किल्ले बांधणे इत्यादी कामे केली.
6. डच कंपनीला डच सरकारने कोणते अधिकार दिले होते?
उत्तर: नोकर ठेवणे, वखारी व किल्ले बांधणे, नाणी पाडणे, युद्ध-तह करणे.
7. डचांनी भारतात कोणकोणत्या ठिकाणी वखारी स्थापन केल्या?
उत्तर: मच्छलीपट्टण, पेतापुली, पुलिकत, कारिकल, ठठ्ठा, चिन्सुरा, नागपट्टण, आग्रा, अहमदाबाद, सुरत, भडोच, खंबायत इत्यादी.
8. फ्रेंच व ब्रिटिश यांच्यात कोणती युद्धे झाली व परिणाम काय झाला?
उत्तर: कर्नाटक युद्धे (१७४४–१७६३) झाली. तिसऱ्या युद्धात फ्रेंचांचा पराभव होऊन इंग्रज भारतात प्रमुख शक्ती बनले.
9. वखारी म्हणजे काय? त्या कशासाठी वापरल्या जात?
उत्तर: वखारी म्हणजे माल साठवण्यासाठीची व व्यापारासाठीची जागा. इंग्रजांनी यामध्ये कोठारे, कार्यालये, निवास व्यवस्था ठेवली होती.
10. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नाणी पाडण्यासाठी कोणत्या ठिकाणी टांकसाळ सुरु केली?
उत्तर: चेन्नई (फोर्ट सेंट जॉर्ज) व मुंबई येथे चांदी, तांब्याची आणि मिश्र धातूंची नाणी पाडली.
Leave a Reply