Notes For All Chapters – इतिहास Class 12
बदलता भारत – भाग २
१.१ सामाजिक क्षेत्र
- १. मानवाधिकार संरक्षण:
- १९९३ मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा संमत.
- राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन – हक्कांचे रक्षण.
- २००५ मध्ये घरगुती हिंसाचार विरोधी कायदा.
- २. महिलांचे संरक्षण:
- २०११: मुलींचे प्रमाण ९१४/१००० – गर्भलिंग तपासणीवर बंदी.
- ‘लेक लाडकी’ अभियान.
- २०१९: तिहेरी तलाक रद्द.
- ३. हमीद दलवाई:
- ‘मुस्लीम सत्यशोधक समाज’ स्थापनेत योगदान.
- समान नागरी कायद्याचा आग्रह.
१.२ आरोग्य
- १. पोलिओ निर्मूलन:
- १९९५: ‘पल्स पोलिओ’ मोहिम – कोणतेही मूल वगळू नये.
- WHO, युनिसेफ, रोटरी आणि भारत सरकारचे योगदान.
- २. आयुष (AYUSH):
- आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी इ. चिकित्सा पद्धतींचा प्रचार.
- १९९५: स्वतंत्र विभाग स्थापन.
- २००९: सुधारित नाव – डिपार्टमेंट ऑफ AYUSH.
- ३. NRHM:
- ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोचवणारी योजना.
१.३ पर्यावरण
- १. प्रदूषण:
- वायू प्रदूषण – वाहनांची संख्या व देखभाल.
- जलप्रदूषण – कारखान्यांचे सांडपाणी.
- उपाय: CNG वापर, PUC प्रमाणपत्र, सीएनजी वाहनांची अट.
- २. पर्यावरण रक्षक:
- सुंदरलाल बहुगुणा – चिपको आंदोलन.
- मेधा पाटकर – नर्मदा बचाव.
- डॉ. राजेंद्र सिंह – जलसंधारण.
- ३. महाराष्ट्रातील प्रयोग:
- राहीबाई पोपेरे – देशी बियाण्यांचे संवर्धन (बीजमाता).
- भाऊ काटदरे – पक्षी व कासव संवर्धन (सह्याद्री निसर्गमित्र).
- प्रेमसागर मेस्त्री – गिधाडांचे संरक्षण (SEESCAP संस्था).
१.४ शिक्षण
- १. साक्षरतेचे प्रयत्न:
- १९९०: ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष’ – केरळ पहिले १००% साक्षर राज्य.
- मोफत नेत्र तपासणी – ज्येष्ठ नागरिकांसाठी.
- २. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण:
- DPEP (१९९४), सर्व शिक्षा अभियान (२००१).
- ‘एज्युसॅट’ उपग्रह – शैक्षणिक कार्यक्रम.
- बालवाडी मुलाखतीवर बंदी, दप्तराचे ओझे निश्चित.
- ३. महाराष्ट्रातील उपक्रम:
- पहिलीपासून इंग्रजी – २००२ पासून.
- पूरक वाचन योजना.
- रात्रशाळा व साखरशाळा.
- स्वयंसेवी संस्थांची मदत – सिंधुदुर्ग, वर्धा साक्षर.
२.१ क्रीडा क्षेत्र
- १. खेळांचे स्वरूप:
- पारंपरिक खेळांमध्ये बदल – वेळ, नियम.
- आयपीएल, प्रो-कबड्डी, टी-२० – व्यावसायिकतेचे आगमन.
- २. खेळाडूंसाठी धोरण:
- २००१: क्रीडा धोरण – प्रशिक्षण, सुविधा, जागृती.
- २०११: ‘या आणि खेळा’ योजना.
- मणिपूरमध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’.
- ३. खेलो इंडिया:
- २०१७ पासून – १२ घटक, शालेय पातळीपासून गोडी.
- राष्ट्रीय क्रीडा विकास निधी – करसवलत.
- पुरस्कार – अर्जुन, ध्यानचंद, राजीव गांधी खेलरत्न.
- निवृत्त खेळाडूंना पेन्शन योजना.
१.३ सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन
- १. पर्यटन वाढ:
- ई-व्हिसा सेवा, १० भाषांमध्ये २४x७ माहिती.
- ‘अतुल्य भारत’ आणि ‘गो नॉर्थईस्ट’ मोहिमा.
- २. पर्यटन प्रशिक्षण:
- आतिथ्य-हॉटेल व्यवस्थापन संस्था.
- रोजगार संधी – गाईड, हॉटेल्स, प्रवासी सेवा.
- ३. वारसा संवर्धन:
- INTACH (१९८४) – सांस्कृतिक वारसा रक्षण.
- वारसा, अमूर्त परंपरा, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये कार्यरत.
- ‘प्रसाद योजना’ – धार्मिक स्थळांचा विकास.
- जयपूरला युनेस्को वारसा दर्जा (२०१९).
Leave a Reply