Notes For All Chapters – इतिहास Class 12
भारत आणि युरोपीय वसाहतवाद
परिचय:
या पाठात युरोपीय वसाहतवाद भारतात कसा विस्तारला आणि त्याचा काय परिणाम झाला याचे अभ्यास केले आहे.
मुख्य चार युरोपीय वसाहतकाऱ्यांचा अभ्यास:
- पोर्तुगीज
 - ब्रिटिश
 - डच
 - फ्रेंच
 
१. पोर्तुगीज
आगमन आणि विस्तार:
- वास्को-द-गामा १४९८ साली कालिकत (कोझीकोडे) येथे पोहोचला.
 - अरब आरमाराचा पराभव करून वर्चस्व निर्माण केले.
 - दक्षिण भारतातील राजांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा फायदा घेतला.
 
वसाहती:
- गोवा ही राजधानी होती.
 - हुगळी (बंगाल), नागपट्टणम, मयिलापूर, दीव, दमण, कोची, कोल्लम इ. ठिकाणी वसाहती उभारल्या.
 - कार्ताझ (परवाना) आवश्यक होता; अन्यथा जहाज जप्त/बुडवले जात.
 
प्रशासन:
- ‘एस्तोदा द इंडिया’ म्हणजे पोर्तुगीज भारतीय साम्राज्य.
 - प्रशासक: विजरई आणि कपितांव-जराल (राजप्रतिनिधी व सेनापती).
 - सल्लागार मंडळ: अर्सबिश्पु, शान्सेलर, वेदोर द फझेंद, कपितांव.
 
व्यापार आणि धोरणे:
- मसाल्यांचे व्यापार प्रमुख.
 - ख्रिस्ती धर्माचा प्रसार, इतर धर्मांना दडपले.
 - स्थानिक भाषा, चालीरीतींवर बंधने.
 - गोवा मुक्त बंदर होते – विविध देशांचे व्यापारी येथे येत.
 
२ ब्रिटिश (East India Company)
स्थापना:
- ३१ डिसेंबर १६००, एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापाराची परवानगी दिली.
 
व्यापार धोरण:
- मसाले खरेदी करून इंग्लंडमध्ये विकणे.
 - फॅक्टरी (वखार) म्हणजे माल साठवणुकीचे ठिकाण.
 - फॅक्टर – वखारीतील अधिकारी.
 - किल्ले उभारणे, नाणी पाडणे याचे अधिकारही मिळाले.
 
महत्वाचे ठिकाणे:
- सुरत, मद्रास (चेन्नई), राजापूर, कारवार, मच्छलीपट्टण, इ.
 - चेन्नईत फोर्ट सेंट जॉर्ज किल्ला व वखार.
 - मुंबई बेट पोर्तुगीजांकडून मिळाले – १६६५ मध्ये पूर्ण ताबा.
 
प्रशासन व सैन्य:
- सुरतेचा प्रेसिडेंट, प्रेसिडेंटचा नोकर, सैनिक, धर्मगुरु, तुतारीवाला, इ.
 - सैनिक – बंदुका, तलवारी असलेले.
 - चांदी, तांबे, जस्त यांची नाणी पाडली.
 
३ डच (Dutch)
स्थापना:
- १६०२ साली ‘युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी’.
 - डच सरकारने युद्ध, तह, किल्ले, नाणी पाडण्याचे अधिकार दिले.
 
व्यापारी ठिकाणे:
- भारतात – मच्छलीपट्टण, नागपट्टण, पुलिकत, कारिकल, अहमदाबाद, सुरत, ठठ्ठा, आग्रा, खंबायत, इ.
 - भारताबाहेर – आफ्रिका, यमनी, इराण, चीन, जपान, इ.
 
धोरणे:
- वखारींना तटबंदी, तोफा लावली.
 - स्थानिक लोकही नोकर म्हणून असत.
 - कोचीच्या राजाशी तह – काळी मिरीच्या निर्यातीचा एकाधिकार.
 
४ फ्रेंच (French)
स्थापना:
- १६६४ मध्ये ‘फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी’ – अर्थमंत्री कोल्बेर यांच्या पुढाकाराने.
 - चौदावा लुई याने सैन्य, करमाफी, तह व युद्धाचे अधिकार दिले.
 
प्रमुख ठिकाणे:
- सुरत, पाँडिचेरी, चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, मच्छलीपट्टण, कासिमबझार, इ.
 - पाँडिचेरी हे प्रमुख ठाणे होते.
 
संघर्ष:
- कर्नाटक युद्धे (१७४४–१७६३) – इंग्रज व फ्रेंच यांच्यात.
 - तिसऱ्या युद्धात इंग्रज विजयी – भारतातील फ्रेंच प्रभाव संपुष्टात.
 
उपसंहार:
- युरोपीय सत्तांनी भारतात वसाहतवादाच्या माध्यमातून केवळ व्यापारच नाही तर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला.
 - यामुळे भारतीय सत्ताधीशांच्या हातून सामर्थ्य निसटले.
 

Leave a Reply