Notes For All Chapters – इतिहास Class 12
भारत : सामाजि व धार्मिक सुधारणा
१. सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता
- भारतीय समाज अंधश्रद्धा, जातिभेद, उच्च-नीच समजुतींनी भरलेला होता.
- इंग्रजी शिक्षणामुळे समाजसुधारकांचे विचार बदलले.
- नवसमाज निर्मितीसाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा आग्रह.
२. सुधारणा पर्व
राजा राममोहन रॉय
- सती प्रथेविरोधात लढा – सती प्रथा बंद (१८२९).
- ब्राह्मो समाजाची स्थापना (१८२८) – मूर्तिपूजेला विरोध.
- आत्मीय सभा, बंगाली साप्ताहिक सुरू.
- इंग्लंडमध्ये भारतीयांचे प्रतिनिधित्व.
- वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आग्रह.
३. धार्मिक सुधारणा चळवळी
प्रार्थना समाज
- स्थापना : परमहंस सभेतून उदय.
- मुख्य कार्यकर्ते : दादोबा पांडुरंग, म.गो. रानडे, डॉ. भांडारकर.
- जातिभेद, मूर्तिपूजा याला विरोध.
आर्य समाज – स्वामी दयानंद सरस्वती
- वेदांचा पुरस्कार, कर्मकांडाला विरोध.
- स्त्री-शिक्षण, विधवा पुनर्विवाह, सामाजिक समता.
सत्यशोधक समाज – महात्मा फुले
- स्थापना : १८७३, पुणे.
- एकेश्वरवाद, पुरोहितांवर टीका, स्त्री शिक्षणाचा आग्रह.
- सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यांचे योगदान.
रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद
- सेवा कार्य : दीनदुबळ्यांची मदत, शिक्षण, आरोग्य, आध्यात्मिक उन्नती.
- युवांना संदेश : “उठा, जागे व्हा…”
४. समाजसुधारकांचे कार्य
सर सय्यद अहमद खान
- मुस्लीम समाजासाठी आधुनिक शिक्षणाचा आग्रह.
- ‘अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी’ची स्थापना (१८७५).
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- जातीभेदविरोधात लढा, बहिष्कृत हितकारिणी सभा.
- वृत्तपत्रे – मूकनायक, जनता, समता.
- बौद्ध धर्म स्वीकार (१९५६), संविधान निर्मितीत योगदान.
ताराबाई शिंदे
- स्त्री-पुरुष समानतेसाठी पहिली लेखिका.
- ‘स्त्री-पुरुष तुलना’ निबंध.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
- डिप्रेस्ड क्लासेस मिशन, मराठी शाळा, उद्योगशाळा.
- मंदिर प्रवेश सत्याग्रह.
रामस्वामी नायकर
- द्रविड चळवळीचे प्रणेते.
- अस्पृश्यता, वर्णव्यवस्था, बालविवाह यांना विरोध.
५. संस्थानिकांचे योगदान
राजर्षी शाहू महाराज
- कोल्हापूर संस्थान – आरक्षण, मोफत व सक्तीचे शिक्षण.
- आंतरजातीय विवाह, स्त्रीहक्क यासंबंधी कायदे.
महाराजा सयाजीराव गायकवाड
- बडोदा संस्थान – शिक्षण, सहभोजन, ग्रामविकास, महिलांसाठी सुधारणा.
कमलादेवी चट्टोपाध्याय
- मिठाच्या सत्याग्रहात भाग.
- स्त्रीहक्कांसाठी आयुष्यभर कार्य.
महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे कार्यकर्ते
महर्षी कर्वे, गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक, अनुताई वाघ – स्त्री शिक्षण.
भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख – ग्रामीण शिक्षण.
संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज – कीर्तनाद्वारे प्रबोधन.
बाबा आमटे, डॉ. नरेंद्र दाभोळकर – समाजसेवा व अंधश्रद्धा निर्मूलन.
Leave a Reply