Notes For All Chapters – इतिहास Class 12
भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
1. निर्वसाहतीकरण ते एकीकरण
निर्वसाहतीकरण म्हणजे काय?
वसाहतवाद्यांनी त्यांच्या वसाहतींमधील सत्ता स्थानिक लोकांकडे हस्तांतरित करणे म्हणजे निर्वसाहतीकरण.
याचे तीन टप्पे –
- वसाहतवादाला विरोध
- स्वातंत्र्यलढा
- वसाहतींना मिळालेले स्वातंत्र्य
भारतातील संस्थानांचे विलीनीकरण:
- भारत स्वतंत्र झाल्यावर ६००+ संस्थाने होती.
- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुत्सद्देगिरीमुळे अनेक संस्थानांचे भारतात विलीनीकरण झाले.
- त्यांनी संस्थानिकांना ‘सामीलनामा’ स्वीकारायला भाग पाडले.
2. जुनागढ, हैदराबाद व काश्मीर
जुनागढ
- गुजरातमधील संस्थान
- नवाब पाकिस्तानच्या बाजूने, पण प्रजा भारताच्या बाजूने
- नवाब पळून गेला, फेब्रुवारी १९४८ ला भारतात विलीनीकरण
हैदराबाद
- भारतातील सर्वात मोठं संस्थान
- निजामने भारतात यायचे नाकारले
- लोकशाहीवादी चळवळींचा जोरदार विरोध
- कासीम रझवीने रझाकार संघटना स्थापन केली
- भारत सरकारने ऑपरेशन पोलो अंतर्गत लष्कर पाठवले
- १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद भारतात विलीन
महत्त्वाची नावे:
- स्वामी रामानंद तीर्थ – नेतृत्व
- गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, फुलचंद गांधी, देवीसिंग चौहान – सहभाग
- १७ सप्टेंबर – मराठवाडा मुक्तीदिन म्हणून साजरा
काश्मीर
- राजा हरिसिंगने सुरुवातीला भारत वा पाकिस्तान दोघात न जाण्याचा निर्णय घेतला
- पाकिस्तानने आक्रमण केल्यावर भारताकडे मदत मागितली
- २७ ऑक्टोबर १९४७ – सामीलनामा भारताला दिला
- काश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडे गेला
- संयुक्त राष्ट्रसंघात वाद
- कलम ३७० अन्वये विशेष दर्जा
3. दादरा व नगर-हवेली
- पोर्तुगीजांचा अंमल
- १९५४ मध्ये ‘युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स’ व ‘आझाद गोमंतक दल’ यांनी चळवळ सुरू केली
- फ्रान्सिस मस्कारन्हीस, विमल सरदेसाई यांचे नेतृत्व
- पोर्तुगीज कॅप्टन फिडाल्गो शरण आला
- २ ऑगस्ट १९५४ – भारतात अधिकृत विलीनीकरण
4. गोवा
- पोर्तुगीजांचा सत्ताकाल – ४५० वर्षे
- १९२८ – गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना
- डॉ. टी.बी. कुन्हा – प्रमुख
- १९४६ – डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली कायदेभंग
- मोहन रानडे – सशस्त्र चळवळीचे नेतृत्व
- ऑपरेशन विजय अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा भारतात सामील
महत्त्वाची नावे:
- सेनापती बापट, विश्वनाथ लवंदे, सुधीर फडके
- जयंतराव टिळक, नानासाहेब काजरेकर, पीटर अल्वारिस
5. पुदुच्चेरी (पाँडिचेरी)
- पुदुच्चेरी, कारिकल, माहे, यानम आणि चंद्रनगर हे फ्रेंचांच्या ताब्यात होते
- कामगार नेता व्ही. सुबय्या यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
- १९५४ – पुदुच्चेरीचा ताबा भारताला मिळाला
- १९६२ – फ्रेंच संसदेची मान्यता
- १९६३ – पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश झाला
Leave a Reply