Question Answers For All Chapters – इतिहास Class 12
बदलता भारत- भाग १
स्वाध्याय
प्र. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
उत्तर:
१. १९४७ च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो (क)गॅट करार म्हणून ओळखला जातो.
२. १७७६ मध्ये जगात सर्वप्रथम (अ)स्वीडन या देशात माहितीचा कायदा लागू झाला.
३. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन (ब)राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
प्र.2 (अ) ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधी नावे लिहा.
उत्तर:
१. २००४ मध्ये सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
२. २००२ मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली – दिल्ली
(ब) दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. कारण –
उत्तर: कारण – (ब) भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही.
प्र.३ पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर: केंद्र सरकारचे अनुकूल धोरण
इंग्रजी भाषेवर प्रभुत्व
कुशल संगणक अभियंते
माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार
उद्योजकांची दूरदृष्टी
आंतरराष्ट्रीय मागणी वाढणे
प्र.४ टीपा लिहा.
१. भारत सरकारचे युवक धोरण
उत्तर: नेहरू युवा केंद्र संघटन, युवक सशक्तीकरण कार्यक्रम, कौशल्य विकास, स्वच्छता व आरोग्य, युवक महोत्सव, युथ हॉस्टेल्स, स्काऊट-गाईड, एनसीसी, एनएसएस.
२. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
उत्तर: २००० साली सुरू, गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडणे, ग्रामीण विकासासाठी रस्त्यांचे महत्त्व ओळखून अंमलबजावणी, ७५००० कि.मी. रस्त्यांचे बांधकाम.
३. स्पीड पोस्ट:
उत्तर: १९८६ मध्ये सुरू, जलद पत्रव्यवस्था, ट्रॅकिंग सुविधा, एसएमएस अलर्ट, व्यवसायिक पार्सल, लॉजिस्टिक्स पोस्ट, कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा.
प्र.५ तुमचे मत नोंदवा.
भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे.
उत्तर: होय, भारताने ‘चांद्रयान’, ‘मंगळयान’, ‘ओशनसॅट’, इ. उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडले आहेत. भारत इतर देशांचे उपग्रहही कमी खर्चात सोडतो. ‘इस्रो’ आणि ‘परम’ महासंगणक यामुळे भारताचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र खूप पुढे गेले आहे.
प्र.६ पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या?
उत्तर: भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबवलेल्या योजना
- प्रधानमंत्री रोजगार योजना (1993): सुशिक्षित तरुणांना रोजगार.
- रोजगार हमी योजना: शेती नसलेल्या दिवसांत रोजगार.
- सुवर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना (1999): अनेक योजना एकत्रित.
- संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (2001): धान्याच्या बदल्यात रोजगार.
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (NREGA): १०० दिवस कामाची हमी.
- किसान क्रेडीट कार्ड योजना: शेतकऱ्यांना आर्थिक मदत.
- प्रधानमंत्री पीक विमा योजना: पिकांच्या नुकसानीवर विमा.
प्र.७ खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा.
माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिह
(अ) भारतात ही चळवळ कशी सुरू झाली?
उत्तर:१९८२ मध्ये एल.के. कुलवाल यांनी माहिती मागितली. अरुणा रॉय यांच्या ‘मजदूर किसान शक्ती संघटना’ने 1990 मध्ये चळवळ केली. अण्णा हजारे यांच्या २००१ मधील आंदोलनामुळे महाराष्ट्रात कायदा लागू झाला.
(ब) माहितीची व्याख्या
उत्तर:
- अभिलेख (Records)
- दस्तावेज (Documents)
- ज्ञापने, आदेश, परिपत्रके, अहवाल
- ई-मेल, अभिप्राय, सल्ला
- रोजवह्या (Logbooks), निविदा (Tenders)
- नमुने (Samples), प्रतिमाने (Models)
- इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील डेटा
- सार्वजनिक प्राधिकरणाकडे असणारी कोणतीही माहिती
(क) माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क
उत्तर:
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार भारतीय नागरिकांना खालील हक्क मिळतात:
- माहिती मागण्याचा हक्क – कोणतीही माहिती (सरकारी कामकाजाशी संबंधित) नागरिक लेखी अर्ज करून मागू शकतो.
- अभिलेख, दस्तावेज पाहण्याचा हक्क – नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणाकडील अभिलेख, पत्रव्यवहार, आदेश इत्यादी पाहण्याची परवानगी असते.
- प्रती मिळवण्याचा हक्क – नागरिकांना दस्तऐवज, अभिलेख, आदेश, नोंदी यांचे प्रमाणित प्रती मिळवण्याचा हक्क आहे.
- नमुने व उतारे मिळवण्याचा हक्क – सरकारी कागदपत्रांचे किंवा सामग्रीचे उतारे व नमुने मिळवण्याचा अधिकार असतो.
- इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती मिळवणे – जर माहिती संगणकात साठवलेली असेल, तर ती CD, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ कॅसेट, प्रिंट अशा स्वरूपात मागवता येते.
- पारदर्शक प्रशासनाचे साधन – या अधिकारामुळे प्रशासन पारदर्शक बनते आणि जनतेचा सहभाग वाढतो.
- उदाहरणार्थ माहिती: सरकारी योजना, खर्चाचे तपशील, कामांची पूर्तता, निविदा माहिती, पत्रव्यवहार, आदेश, तक्रारीचा निपटारा इ. मिळवता येते.
Leave a Reply