Question Answers For All Chapters – इतिहास Class 12
बदलता भारत – भाग २
स्वाध्याय
प्र. 1 (अ) योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने लिहा.
उत्तर:
१. 1995 मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.
२. एर्नाकुलम हा 100% साक्षर झालेला जिल्हा केरळ राज्यात आहे.
(ब) पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
‘अ’ गट | ‘ब’ गट (दुरुस्त केलेली जोडी) |
---|---|
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग | मानवी हक्कांचे संरक्षण |
सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एनव्हायरनमेंट | दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास |
सी-स्कॅप | गिधाडांचे संवर्धन करणारी संस्था |
इंटॅक (INTACH) | वारशाविषयी जतन व जागृती करणारी संस्था |
उत्तर:
चुकीची जोडी:
३. सी-स्कॅप – कासवांचे जतन करणारी संस्था
बरोबर दुरुस्ती:
सी-स्कॅप – गिधाडांचे जतन करणारी संस्था
प्र. 2 ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांची नावे लिहा:
उत्तर:
1. मानव अधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
2. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू – सचिन तेंडुलकर
प्र.3 पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर:
क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार:
- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
- अर्जुन पुरस्कार
- द्रोणाचार्य पुरस्कार
- ध्यानचंद लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार
- मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी
- राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार
प्र. 4 टीपा लिहा:
सर्व शिक्षा अभियान –
उत्तर: सर्व शिक्षा अभियान ही योजना भारत सरकारने 2001 मध्ये सुरू केली. यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा मूलभूत अधिकार देण्यात आला. या योजनेचा उद्देश म्हणजे शिक्षणातील विषमता दूर करणे, विशेषतः मुलींचे व दिव्यांग मुलांचे शिक्षण यावर भर देणे. खडू-फळा योजना, पोषक आहार योजना यांचा समावेश या योजनेत करण्यात आला. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
वायू प्रदूषण –
उत्तर: वायू प्रदूषण भारतातील एक गंभीर समस्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाहनांची वाढती संख्या, त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष, आणि औद्योगिक धूर. दिल्लीतील वायू प्रदूषणाची तीव्रता सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेंट संस्थेने स्पष्ट केली.
1998 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक वाहनांमध्ये सीएनजी (CNG) इंधन वापरण्याचे आदेश दिले. पुढे “नो पीयूसी, नो इन्शुरन्स पॉलिसी” हे धोरण लागू करण्यात आले. पीयूसी (Pollution Under Control) प्रमाणपत्राशिवाय वाहन विमा मिळत नाही.
वायूप्रदूषणाचा परिणाम पर्यावरणावर आणि आरोग्यावर होतो. त्यामुळे स्वच्छ इंधनाचा वापर, वाहनांची देखभाल, वृक्षारोपण यांसारख्या उपायांची अंमलबजावणी गरजेची आहे.
पोलिओ निर्मूलन –
उत्तर: भारत सरकारने 1995 मध्ये ‘पल्स पोलिओ’ लसीकरण मोहीम सुरू केली. या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे 5 वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ लस देऊन देशातून पोलिओचा पूर्णतः नायनाट करणे.
या मोहिमेमध्ये “दो बूँद जिंदगी की” हे प्रसिद्ध घोषवाक्य वापरण्यात आले. लसीकरणासाठी शिबिरे, घरोघरी मोहिमा आणि प्रसारमाध्यमांचा वापर करण्यात आला.
ही मोहीम WHO (जागतिक आरोग्य संघटना), युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने राबवण्यात आली.
यामुळे भारत पोलिओमुक्त देश बनला हे एक मोठे आरोग्यविषयक यश मानले जाते.
प्र.5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
१. भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा.
उत्तर: भारत सरकारने 2001 मध्ये क्रीडा धोरण जाहीर केले. या धोरणाचे उद्दिष्ट म्हणजे खेळांचा प्रसार, खेळाडूंना सुविधा, प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय फेडरेशनला मदत करणे आणि क्रीडा प्रशिक्षण देणे. यामुळे खेळातील गुणवत्ता वाढवण्यास मदत झाली.
२. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या सुविधा सुरू केल्या?
उत्तर: सरकारने ई-व्हिसा, बहुभाषिक माहिती सेवा, टोल फ्री क्रमांक, पर्यटन शिक्षण संस्था, हॉटेल्स, क्रुझ, आरोग्य, साहसी पर्यटन सुविधा सुरू केल्या. ‘अतुल्य भारत’, ‘गो नॉर्थईस्ट’ अशा मोहिमा देखील राबवल्या.
प्र.६ तुमचे मत लिहा.
१. संरक्षणविषयक सराव दोन राष्ट्रांनी एकत्र करणे आवश्यक असते.
उत्तर: होय, कारण यामुळे दोन्ही राष्ट्रांमध्ये विश्वास वाढतो, तांत्रिक ज्ञानाची देवाण-घेवाण होते आणि सुरक्षाविषयक कौशल्ये वाढतात.
२. पर्यटनस्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी.
उत्तर: होय, कारण पर्यटनस्थळे हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्यांचे जतन केले पाहिजे. स्वच्छता, नियम पाळणे आवश्यक आहे.
Leave a Reply