Question Answers For All Chapters – इतिहास Class 12
युरोपीय वसाहतवाद
स्वाध्याय
प्र.1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
उत्तर :
१. ‘स्वातंत्र्याचा जाहिरनामा’ थॉमस जेफरसन याने तयार केला.
२. दुसरे ब्रह्मी युद्ध लॉर्ड डलहौसी च्या काळात लढले गेले.
प्र.१ (ब) पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
उत्तर : चुकीची जोडी :
४. आयव्हरी कोस्ट – पोर्तुगीज वसाहत
दुरुस्त जोडी :
४. आयव्हरी कोस्ट – फ्रेंच वसाहत
प्र.2 (अ) ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीची नावे लिहा.
१. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता –
उत्तर : स्पेन
२. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले –
उत्तर : राणी एलिझाबेथ पहिली
(ब) दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
१. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण –
उत्तर : (ब) म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
प्र.3 संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर : वसाहतवाद फोफावण्याची कारणे :
औद्योगिक क्रांती
कच्च्या मालाची गरज
अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक
खनिज साठे
भौगोलिक महत्त्व
मजुरांची उपलब्धता
वंशश्रेष्ठत्वाची कल्पना
प्र.4 टीपा लिहा.
१. वसाहतवादाचे स्वरूप
उत्तर : वसाहतवाद हा प्रगत देशाकडून दुर्बल देशांवर ताबा मिळवून, त्या प्रदेशाचे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक शोषण करणारी प्रक्रिया आहे. स्थानिक संसाधनांचा वापर करून, त्या देशातील लोकांना गुलाम बनवले जाते.
२. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध :
उत्तर : अमेरिकेतील तेरा वसाहतींनी इंग्लंडविरुद्ध स्वातंत्र्याची लढाई पुकारली. ४ जुलै १७७६ रोजी थॉमस जेफरसनने तयार केलेला ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ मंजूर केला गेला. अखेर १७८१ मध्ये इंग्रजांचा पराभव झाला आणि अमेरिका स्वतंत्र झाली.
प्र.5 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली.
कारण : औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनात मोठी वाढ झाली. हे उत्पादन विकण्यासाठी नवीन बाजारपेठांची गरज होती. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांनी वसाहती स्थापन केल्या.
२. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.
कारण : युरोपीय राष्ट्रांना सोन्या-चांदीचे साठे, सस्ते मजूर, आणि कृषिक उपज यांसाठी अमेरिकेतील जमिनी ताब्यात घ्याव्याशा वाटल्या. त्यामुळे स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स यांनी वसाहती स्थापन केल्या.
Leave a Reply