Question Answers For All Chapters – इतिहास Class 12
भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
स्वाध्याय
प्र.1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
उत्तर:
१. गोवा येथे इ.स.१९४६ मध्ये डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले.
२. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तिलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले.
३. भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.
(ब) पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
उत्तर: चुकीची जोडी:
२. काश्मीर संस्थानचे विलिनीकरण – शेख अब्दुल्ला
दुरुस्त उत्तर:
२. काश्मीर संस्थानचे विलिनीकरण – राजा हरिसिंग
प्र.2 ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीची नावे लिहा.
उत्तर:
१. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान – जुनागढ
२. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख – डॉ. टी.बी. कुन्हा
प्र.3 पृष्ठ क्र.५६ वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
उत्तर: १. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र – पाकिस्तान
२. भारतातील पोर्तुगिजांचे सत्ताकेंद्र – गोवा
३. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ताकेंद्रे – पुदुच्चेरी, यानम, माहे, कारिकल, चंद्रनगर
४. भारताच्या दक्षिणेस असलेले राष्ट्र – श्रीलंका
प्र.4 पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर: गोवा मुक्तिलढ्यातील कार्यकर्ते
डॉ. टी.बी. कुन्हा
डॉ. राम मनोहर लोहिया
मोहन रानडे
पीटर अल्वारिस
शिरूभाऊ लिमये
सुधा जोशी
पंडित महादेवशास्त्री जोशी
प्र.5 विधाने कारणासहित स्पष्ट करा:
१. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
उत्तर: निजामाने भारतात सामील होण्यास नकार दिला आणि ‘रझाकार’ संघटनेच्या माध्यमातून प्रजेवर अत्याचार केले. त्यामुळे भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ ही लष्करी कारवाई केली आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद भारतात विलीन झाले.
२. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला.
उत्तर: भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये करार झाल्यानंतर १ नोव्हेंबर १९५४ रोजी पुदुच्चेरी भारतात विलीन झाले. १९६३ मध्ये या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
प्र.6 तुमचे मत नोंदवा:
१. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली.
उत्तर: होय, कारण निजामाच्या राजवटीत लोकांना नागरी व राजकीय हक्क नव्हते. हक्क मिळवण्यासाठी प्रजेने वेगवेगळ्या प्रांतांमध्ये या परिषदांची स्थापना केली.
२. इ.स. १९६१ पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली.
उत्तर: होय, कारण पोर्तुगीजांनी स्वेच्छेने सत्ता सोडली नाही. त्यामुळे शेवटी भारताने ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत लष्करी कारवाई केली आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा भारतात सामील झाला.
Leave a Reply