Question Answers For All Chapters – इतिहास Class 12
जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय
प्र.1 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
उत्तर: १. पहिल्या महायुद्धात (ड) जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला.
२. १९३५ मध्ये (अ) म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला.
३. १९४७ मध्ये पहिली (ब) आशियाई परिषद भरवली गेली.
(ब) पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
बांडुंग | बांडुंग परिषद |
पॅरिस | आशियाई एकप परिषद |
लंडन | १९५८ मधील अखिल आफ्रिका एकप परिषद |
मँचेस्टर | १९४५ मधील अखिल आफ्रिका एकप परिषद |
४. मँचेस्टर – आशियाई ऐक्य परिषद
उत्तर: दुरुस्ती: मँचेस्टर – १९४५ मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद
प्र.2 दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
१. दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. कारण –
उत्तर: (क) दुसऱ्या महायुद्धकाळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली.
प्र.3 टीपा लिहा.
१. बांडुंग परिषद
उत्तर: १९५५ मध्ये इंडोनेशियामधील बांडुंग येथे आशिया व आफ्रिकेतील राष्ट्रांची परिषद भरवण्यात आली. यामध्ये जागतिक शांतता, सहकार्य आणि आफ्रो-आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा झाली.
२. आफ्रिकी ऐक्य कल्पना
उत्तर: एच.एस. विल्यम्स यांनी ही संकल्पना मांडली. १९०० मध्ये लंडनमध्ये पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद झाली. डब्ल्यू.ई.बी. द्यूब्वा यांच्या पुढाकाराने आफ्रिकन एकतेची चळवळ पुढे वाढली.
प्र.4 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१. ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात तीन युद्धे झाली.
उत्तर:- कारण: म्यानमारच्या विस्तारवादामुळे ब्रिटिशांच्या सीमांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे ब्रिटिशांनी म्यानमारविरुद्ध तीन वेळा युद्ध केले आणि शेवटी म्यानमार आपले वर्चस्व गमावून बसला.
२. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.
उत्तर:- कारण: महायुद्धानंतर वसाहतवादी राष्ट्रे आर्थिक व लष्करी दृष्ट्या कमकुवत झाली होती. त्यामुळे आशिया व आफ्रिकेतील देशांनी स्वातंत्र्यासाठी आंदोलन तीव्र केले आणि एकामागून एक देश स्वतंत्र होत गेले.
Leave a Reply