भारतीय समाजाचे वर्गीकरण
Short Questions
1. ‘आदिवासी’ या संज्ञेचा अर्थ काय आहे?
उत्तर: आदिवासी म्हणजे समान वंशज असलेले, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भौगोलिक अलिप्तता असलेले भारताचे मूळ रहिवासी गट.
2.आदिवासी लोक कुठे राहतात?
उत्तर: आदिवासी लोक डोंगराळ, जंगल व दुर्गम भागात राहतात.
3.भारतामध्ये आदिवासींची पाच भौगोलिक विभागणी कोणी केली?
उत्तर: एल. पी. विद्यार्थी यांनी केली.
4.आदिवासींचे धार्मिक श्रद्धा कोणत्या प्रकारच्या असतात?
उत्तर: निसर्गपूजा, पूर्वजपूजा, जीवात्मवाद, चेतनावाद, कुलप्रतिकवाद आणि मानववाद.
5.वारली जमात कोणत्या राज्यात आढळते?
उत्तर: महाराष्ट्रातील ठाणे, पालघर जिल्ह्यात.
6. ‘देवराई’ म्हणजे काय?
उत्तर: देवराई म्हणजे आदिवासींच्या धार्मिक श्रद्धांनी पवित्र मानले जाणारे वन.
7. ‘झूम शेती’ कोणत्या भागात केली जाते?
उत्तर: ईशान्य भारतात.
8. आदिवासी समाजाचा धर्म कोणावर आधारित असतो?
उत्तर: निसर्ग आणि पूर्वजांवर.
9. शासनाने आदिवासींसाठी कोणती शिक्षण योजना सुरू केली?
उत्तर: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, दहावी उत्तीर्णांसाठी शिष्यवृत्ती, आणि आदिवासी महिलांसाठी शैक्षणिक संकुले.
10. शहरांमध्ये लोकसंख्येची घनता कशी असते?
उत्तर: जास्त असते.
11. ग्रामीण समाजाचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे?
उत्तर: शेती.
12. गावांमध्ये पंचायतीचे तीन स्तर कोणते?
उत्तर: ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद.
13. भारतातील ग्रामीण समाजाचे वैशिष्ट्य काय?
उत्तर: सामूहिकता, कृषिप्रधान जीवन, परंपरागत मूल्ये आणि जातीव्यवस्थेचा प्रभाव.
14. शहरी समाजामध्ये कोणते व्यवसाय केले जातात?
उत्तर: उद्योग, सेवा, व्यापार.
15. शहरात सामाजिक विविधता कशी असते?
उत्तर: फार मोठ्या प्रमाणात असते.
Long Questions
1. आदिवासी समाजाचे धार्मिक वैशिष्ट्ये सांगा.
उत्तर:आदिवासी समाज निसर्गपूजा, जीवात्मवाद, चेतनावाद, कुलप्रतिकवाद आणि मानववाद यांवर विश्वास ठेवतो. ते प्रत्येक सजीव-निर्जीव गोष्टीत आत्मा मानतात आणि पवित्र वने, नद्या, सूर्य यांची पूजा करतात.
2. आदिवासींच्या समस्या कोणत्या आहेत?
उत्तर: जमीन गमावणे, दारिद्र्य, कुपोषण, शैक्षणिक मागासलेपण, वेठबिगारी आणि औद्योगिकीकरणामुळे विस्थापन. त्यांना सामाजिक आणि आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागते.
3. देवराईचे महत्त्व काय आहे?
उत्तर: देवराई म्हणजे पवित्र वने, जी आदिवासींची श्रद्धास्थाने असतात. ती निसर्गाचे संरक्षण करतात आणि जैवविविधतेचे रक्षण करत देवतांची पूजा करतात.
4. ग्रामीण समाजाचे वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर: कृषिप्रधान जीवन, परंपरागत मूल्ये, सामाजिक ऐक्य आणि जातीव्यवस्थेचा प्रभाव. येथे एकत्र कुटुंबपद्धती आणि धार्मिक श्रद्धांना महत्त्व आहे.
5. ग्रामीण समाजातील स्त्रीचे स्थान काय आहे?
उत्तर: ग्रामीण समाजात स्त्रीला दुय्यम स्थान असते, आणि निर्णय प्रामुख्याने पुरुष घेतात. त्या परंपरागत कामे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि धार्मिक विधींमध्ये गुंतलेल्या असतात.
6. शहर समाजाची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
उत्तर: घन लोकसंख्या, विविध भाषा-संस्कृती, उद्योग-व्यवसाय आणि व्यक्तिवाद. आधुनिकता, बाजारपेठ-आधारित अर्थव्यवस्था आणि सुधारित पायाभूत सुविधांचा प्रभाव दिसतो.
7. शहरीकरणामुळे कोणते बदल होतात?
उत्तर: रोजगाराच्या संधी वाढतात, पण निवासाची टंचाई आणि दाटीवाटी होते. सामाजिक एकोपा कमी होऊन व्यक्तिकेंद्रितता वाढते.
8. आदिवासींच्या जीवनशैलीमध्ये काय बदल झाला आहे?
उत्तर: ते आता ग्रामीण आणि शहरी समाजात मिसळू लागले आहेत. त्यांच्या परंपरा, भाषा आणि धर्म यांचे सांस्कृतिक विघटन होत आहे.
9. ‘पंचशील तत्त्व’ काय होते?
उत्तर: पंचशील तत्त्वे म्हणजे आदिवासींच्या गुणांनुसार विकास, वनप्रदेशातील हक्कांचे संरक्षण, प्रशिक्षणाद्वारे गटबांधणी, गरजेनुसार प्रशासन, आणि मानवी जीवनाच्या गुणवत्तेवर आधारित मूल्यमापन. त्यांच्या परंपरांवर बंधने न आणता आत्मनिर्भरता हे ध्येय आहे.
10. ग्रामीण समाजाच्या समस्या कोणत्या आहेत?
उत्तर: दारिद्र्य, निरक्षरता, जातीव्यवस्था, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतीवरील अवलंबन अधिक असून विकास संथ आहे.
Leave a Reply