Questions Answers For All Chapters – भूगोल Class 7
कृषी
स्वाध्याय
प्रश्न 1: खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा.
1. या शेतीप्रकारात पीक बदल केला जातो.
उत्तर: (अ) सखोल शेती
2. शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या.
उत्तर: (आ) प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर.
3. भारतात शेतीचा विकास झाला आहे, कारण…
उत्तर: (ई) भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे.
4. भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण …
उत्तर: (ई) आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत.
प्रश्न 2: खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा.
उत्तर: जलसिंचनामुळे पिकांना वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा होतो. पावसाळ्याबाहेरही पाणी मिळाल्यामुळे उत्पादन वाढते.
2. जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा.
उत्तर:
ठिबक सिंचन: यात पाणी थेट रोपांच्या मुळांना टप्प्याटप्प्याने दिले जाते, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही.
फवारा सिंचन: यात पाणी पंपाच्या मदतीने हवेत उडवून पिकांवर पसरवले जाते, ज्यामुळे संपूर्ण पिकाला एकसमान पाणी मिळते.
3. शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्यशेतीची माहिती लिहा.
उत्तर:
शेतीचे प्रकार:
निर्वाह शेती: शेतकरी स्वतःच्या गरजेसाठी पीक घेतात.
व्यापारी शेती: मोठ्या प्रमाणावर पीक घेऊन विक्रीसाठी उत्पादन होते.
सखोल शेती: कमी जागेत अधिक उत्पादन मिळवण्यासाठी केली जाते. यात खतांचा वापर जास्त असतो.
विस्तृत शेती: मोठ्या क्षेत्रात पीक घेतले जाते, जिथे मोठ्या यंत्रांचा वापर होतो.
4. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
मळ्याची शेती डोंगराळ भागात होते.
यात एकाच प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते.
यात प्रमुख पिके म्हणजे चहा, कॉफी, रबर इत्यादी.
मोठ्या प्रमाणावर भांडवल आणि कुशल कामगार आवश्यक असतात.
5. तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात? त्याची भौगोलिक कारणे कोणती?
उत्तर:
माझ्या परिसरात तांदूळ, गहू, उस, कांदा आणि डाळींची पिके घेतली जातात.
भौगोलिक कारणे:
तांदूळ: भरपूर पाऊस आणि चिकट माती
गहू: थंड हवामान आणि गाळाची माती
ऊस: भरपूर पाणी आणि उष्ण हवामान
कांदा: कोरडे हवामान आणि हलकी माती
6. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत?
उत्तर:
भारतात मुख्यतः खरीप आणि रब्बी हंगामात शेती केली जाते कारण पाऊस आणि हवामान हंगामी आहे.
बारमाही शेती करण्यासाठी जलसिंचनाच्या सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि साठवणुकीच्या सोयी आवश्यक असतात, ज्या सर्वत्र उपलब्ध नाहीत.
Nonu says
Very nice 💯
not very long answers I like it 👍😀
Meena says
very nice