Notes For All Chapters – इतिहास Class 7
मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
१. शाहू महाराजांची सुटका आणि संघर्ष
- औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला.
 - शाहू महाराज मुघलांच्या ताब्यात होते.
 - आझमशाहाने मराठ्यांमध्ये फूट पडावी म्हणून त्यांना सोडले.
 - महाराणी ताराबाई यांनी शाहू महाराजांचा छत्रपतीपदाचा हक्क मान्य केला नाही.
 - खेडच्या लढाईत शाहू महाराजांनी विजय मिळवला आणि साताऱ्यात राज्याभिषेक केला.
 - यामुळे सातारा आणि कोल्हापूर असे दोन स्वतंत्र मराठा राज्य निर्माण झाले.
 
२. मराठ्यांचे नवे धोरण
- आधी मुघलांविरुद्ध लढत होते, पण आता त्यांनी मुघलांना रक्षण देण्याचे धोरण स्वीकारले.
 - दिल्ली दरबारात स्पर्धा आणि बाहेरून हल्ले यामुळे मुघल सत्ता कमजोर झाली.
 - मराठ्यांनी त्याचा फायदा घेत आपल्या सत्तेचा विस्तार केला.
 
३. बाळाजी विश्वनाथ – पहिला पेशवा
- शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे बनवले.
 - त्यांनी मुत्सद्देगिरीने मराठ्यांना एकत्र आणले.
 - कान्होजी आंग्रे हे आरमारप्रमुख होते, त्यांनी सुरुवातीला विरोध केला पण नंतर शाहू महाराजांना साथ दिली.
 - बाळाजींनी दिल्लीच्या मुघल बादशहाकडून चौथाई आणि सरदेशमुखी कर वसूल करण्याचा हक्क मिळवला.
 
४. पहिला बाजीराव – पराक्रमी सेनानी
- बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर पहिला बाजीराव पेशवा झाला.
 - त्याने मराठ्यांचा प्रभाव उत्तर भारतात वाढवला.
 
पालखेडची लढाई (१७२८)
- निजाम-उल-मुल्कने मराठ्यांना विरोध केला.
 - बाजीरावाने त्याचा पालखेड येथे पराभव केला.
 - यामुळे निजामाने मराठ्यांचा चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला.
 
माळवा आणि बुंदेलखंड जिंकले
- बाजीरावाने माळवा आणि बुंदेलखंड येथे मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
 - बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याला मदत करून बाजीरावाने बंगशाचा पराभव केला.
 
दिल्ली स्वारी (१७३७) आणि भोपाळची लढाई
- बाजीरावाने दिल्लीच्या सीमेपर्यंत स्वारी केली.
 - निजामाने पराभव स्वीकारला आणि माळवा मराठ्यांना दिले.
 
वसई विजय (१७३९)
- पोर्तुगीज अत्याचार करत होते.
 - चिमाजी आप्पा यांनी ठाणे आणि वसई जिंकले.
 
बाजीरावाचा मृत्यू (१७४०)
- नादिरशाहने दिल्ली लुटल्यावर बाजीराव उत्तर भारतात गेला.
 - नर्मदा नदीजवळ रावेरखेडी येथे त्याचा मृत्यू झाला.
 - त्याने मराठ्यांना भारतातील बलशाली सत्ता बनवले.
 
महत्वाचे शब्द आणि अर्थ
- चौथाई – महसुलाचा १/४ भाग
 - सरदेशमुखी – महसुलाचा १/१० भाग
 - पेशवा – मराठा राजकारणातील प्रमुख मंत्री
 - खेडची लढाई – शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यातील संघर्ष
 - पालखेडची लढाई – मराठे वि. निजाम
 

Leave a Reply