Question Answers For All Chapters – इतिहास Class 7
मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
स्वाध्याय
१. म्हणजे काय?
उत्तर:
(१) चौथाई – महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग.
(२) सरदेशमुखी – महसुली उत्पन्नाचा एक दशांश भाग.
२. एका शब्दात उत्तर द्या.
(१) बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता – श्रीवर्धन
(२) बुंदेलखंडात याचे राज्य होते – छत्रसाल
(३) या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला – रावेरखेडी
(४) पोर्तुगिजांचा पराभव यांनी केला – चिमाजी आप्पा
३. लिहा.
(१) कान्होजी आंग्रे – मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख. सुरुवातीला महाराणी ताराबाईंच्या बाजूने होते, परंतु नंतर शाहू महाराजांकडे वळाले.
(२) पालखेडची लढाई – १७२८ मध्ये निजाम-उल-मुल्क विरुद्ध पहिला बाजीराव यांच्यात झालेली लढाई. मराठ्यांचा विजय.
(३) बाळाजी विश्वनाथ – शाहू महाराजांचे पहिले पेशवे. मुत्सद्देगिरीने मराठ्यांचा प्रभाव वाढवला.
(४) पहिला बाजीराव – शाहू महाराजांचा पेशवा, उत्तरेत मराठ्यांचा सत्ताविस्तार केला.
४. कारणे लिहा.
(१) मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली.
उत्तर: शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात संघर्ष झाल्यामुळे शाहू महाराज सातारचे छत्रपती तर ताराबाईंच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर राज्य स्वतंत्र राहिले.
(२) आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.
उत्तर: शाहू महाराज मोकळे झाले तर मराठ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष होईल, त्यामुळे त्यांचे सामर्थ्य कमी होईल, या हेतूने आझमशाहाने त्यांची सुटका केली.
(३) दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज होती.
उत्तर: दिल्लीच्या मुघल सत्तेला इराणी, अफगाणी आक्रमणांचा तसेच राजपूत, जाट, रोहिले इत्यादींचा धोका होता. मराठ्यांचे साहाय्य घेतल्यास त्यांचा प्रभाव टिकून राहील, म्हणून त्यांना मराठ्यांची मदत हवी होती.
Leave a Reply