Question Answers For All Chapters – इतिहास Class 7
साम्राज्याची वाटचाल
स्वाध्याय
१. एका शब्दात लिहा:
उत्तर:
- इंदौरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या – अहिल्याबाई होळकर
- नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वांत कर्तबगार व पराक्रमी पुरुष – रघुजी भोसले
- दिल्लीच्या गादीवर बादशाहाला पुनःस्थापित करणारे – महादजी शिंदे
- दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे – नाना फडणवीस
२. घटनाक्रम लिहा:
उत्तर:
- मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व – इ.स. 1751
- इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला – इ.स. 1817
- आष्टीची लढाई – इ.स. 1818
३. लिहा:
(1) अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे:
उत्तर:
- अहिल्याबाईंनी इंदौरच्या राज्यकारभाराची सूत्रे समर्थपणे हाताळली.
- त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन कायदे तयार करून शेती, कर वसुली यामध्ये सुधारणा केली.
- विहिरी, तलाव, मंदिरे, घाट, धर्मशाळा यांची उभारणी करून लोककल्याणकारी कार्य केले.
- न्यायप्रिय शासन करून प्रजेला सुरक्षित व समाधानी जीवन दिले.
(2) महादजी शिंदेंचा पराक्रम:
उत्तर:
- पानिपतच्या पराभवानंतर त्यांनी उत्तरेतील मराठ्यांची प्रतिष्ठा पुन्हा उंचावली.
- इंग्रजांना रोखण्यासाठी त्यांनी आपल्या सैन्याला नवीन युद्धकौशल्य शिकवले.
- बादशाह शाह आलम याला दिल्लीच्या गादीवर बसवले आणि दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात ठेवली.
- गुलाम कादिर याचा पराभव करून लाल किल्ल्यातील संपत्ती बादशाहाला परत दिली.
(3) गुजरातमधील मराठी सत्ता:
उत्तर:
- सेनापती खंडेराव दाभाडे व त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
- खंडेरावाच्या मृत्यूनंतर उमाबाई दाभाडे यांनी अहमदाबादचा मुघल सरदार पराभूत केला.
- पुढे गायकवाड घराण्याने गुजरातमध्ये सत्ता स्थिर केली व वडोदरा हे राजधानी म्हणून विकसित केले.
४. मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे – चर्चा:
- मराठा सरदारांमध्ये एकोपा राहिला नाही आणि अंतर्गत मतभेद वाढले.
- पेशवा बाजीराव दुसरा याच्याकडे योग्य नेतृत्वगुण नव्हते.
- इंग्रजांची राजकीय डावपेच आणि आधुनिक शस्त्रास्त्रे यामुळे मराठ्यांचा पराभव झाला.
- 1817 मध्ये इंग्रजांनी पुणे ताब्यात घेतले आणि 1818 मध्ये आष्टीच्या लढाईत मराठ्यांना निर्णायक पराभव पत्करावा लागला.
Leave a Reply