Question Answers For All Chapters – इतिहास Class 7
शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
स्वाध्याय
1. खालील तक्ता पूर्ण करा:
गाव / मौजा | कसबा | परगणा |
---|---|---|
कशास म्हणतात | लहान गाव किंवा मौजा | मोठे खेडेगाव, परगण्याचे मुख्य ठिकाण |
पदाधिकारी | पाटील, कुलकर्णी | शेटे, महाजन |
उदाहरण | वडगाव, शिरगाव | इंदापूर कसबा, वाई कसबा |
2. म्हणजे काय?
- बुद्रुक – मूळ किंवा जुन्या गावाला “बुद्रुक” म्हणतात.
- बलुतं –गावातील कारागीर व सेवा पुरवणाऱ्यांना शेतकऱ्यांकडून शेती उत्पन्नाचा काही वाटा मिळायचा, त्याला बलुतं म्हणतात.
- वतन – परंपरेने मिळणारे अधिकार व जमीन, जी पिढ्यान्पिढ्या वापरली जात असे.
3. शोधून लिहा:
- कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक – सिद्दी
- अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार – संत ज्ञानेश्वर
- संत तुकारामांचे गाव – देहू
- भारुडाचे रचनाकार – संत एकनाथ
- बलोपासनेचे महत्त्व सांगणारे – समर्थ रामदास
- स्त्री संतांची नावे – संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई
4. तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा:
(1) संत नामदेव:
उत्तर: संत नामदेव वारकरी संप्रदायातील थोर संत होते. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांचे अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी पंजाबपर्यंत आपल्या विचारांचा प्रसार केला आणि त्यांच्या पदांचा समावेश “गुरुग्रंथसाहिब” मध्ये केला गेला.
(2) संत ज्ञानेश्वर:
उत्तर: संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. त्यांनी संस्कृत “भगवद्गीता” चा मराठीत अनुवाद करून “ज्ञानेश्वरी” हा ग्रंथ लिहिला. त्यांनी “अमृतानुभव” ग्रंथही रचला. त्यांच्या लेखनाने भक्ती चळवळीला बळ मिळाले.
(3) संत एकनाथ:
उत्तर: संत एकनाथ हे भागवत धर्माचे समर्थक होते. त्यांनी लोकभाषेत रामकथा लिहून “भावार्थ रामायण” रचले. त्यांच्या भारुड आणि अभंगांनी समाजाला समता, भक्ती आणि नैतिकता शिकवली.
(4) संत तुकाराम:
उत्तर: संत तुकाराम यांनी वारकरी संप्रदायाला मोठे बळ दिले. त्यांनी सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धांविरोधात कठोर भूमिका घेतली. त्यांच्या अभंगरचनांनी लोकांमध्ये समतेची जाणीव निर्माण केली.
5. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते?
उत्तर: दुष्काळामुळे पाऊस पडत नसे, त्यामुळे पीक उगवत नसे. अन्नधान्याच्या टंचाईमुळे लोक उपाशी राहत. पाण्याची कमतरता असल्याने लोकांना आणि जनावरांना खूप त्रास व्हायचा. अनेक लोक गाव सोडून दुसरीकडे स्थलांतर करायचे. त्यामुळे दुष्काळ हे लोकांसाठी सर्वात मोठे संकट मानले जात असे.
Leave a Reply