Question Answers For All Chapters – इतिहास Class 7
आदर्श राज्यकर्ता
स्वाध्याय
1. पाठात शोधून लिहा.
(१) शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते?
उत्तर:
- अफजलखान भेटीचा प्रसंग
- पन्हाळगडाचा वेढा
- शायिस्ताखानावर छापा
- आग्र्यातून सुटका
(२) शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण?
उत्तर:
- हिरोजी फर्जंद
- मदारी मेहेतर
(३) रोहिडखोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली ?
उत्तर:
- गावोगाव फिरून सुरक्षित ठिकाणी लोकांना नेण्यास सांगितले.
- एका क्षणाचाही विलंब न करण्याचे आदेश दिले.
- जर रयतेची काळजी घेतली नाही, तर मुघल सैन्य येऊन त्रास देईल, आणि त्याचे पाप माथी बसेल.
(४) शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील ?
उत्तर:
- स्वराज्य स्थापना आणि सुराज्याची निर्मिती
- परकीय आक्रमणांविरुद्ध संघर्ष
- न्याय, सहिष्णुता आणि लोकहितकारी धोरणे
2. लिहिते व्हा.
(1) रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी सैनिकांना दिलेली ताकीद:
उत्तर:
- सैनिकांनी शेतकऱ्यांचे नुकसान करू नये.
- लष्कराच्या हालचालींमुळे पिकांचे नुकसान होऊ नये.
- कोणत्याही परिस्थितीत लुटालूट करू नये.
- महाराजांनी 1674 मध्ये लष्करी अधिकाऱ्यांना पत्र लिहून ही सूचना दिली.
(२) शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णूहोते, हे कोणत्या बाबीवरून दिसून येते?
उत्तर:
- मुस्लिम धर्मस्थळांना आदर देणे.
- मशिदींना धक्का न लावण्याची ताकीद.
- कुराण मिळाल्यास मुसलमानांच्या ताब्यात देण्याचा आदेश.
- स्वराज्यातील मुस्लिमांना सन्मानपूर्वक वागणूक देणे.
(३) शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा
उत्तर:
- शिस्तबद्ध लष्कर तयार केले.
- सैनिकांना वेळच्या वेळी वेतन देण्याची व्यवस्था केली.
- जहागिरीऐवजी रोख वेतनाची प्रथा सुरू केली.
- लढाईत शत्रूला शरण आलेल्यांना योग्य वागणूक देणे.
- मृत सैनिकांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे.
3. एका शब्दात उत्तर द्या.
(1) स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी: दौलतखान
(2) शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमीळ कवी: सुब्रमण्यम भारती
(3) बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा: छत्रसाल
(4) पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे: महात्मा जोतीराव फुले
Leave a Reply