Notes For All Chapters – नागरिकशास्त्र Class 7
आपल्या संविधानाची ओळख
1. संविधान म्हणजे काय?
संविधान म्हणजे देशाच्या कारभारासाठी तयार केलेले नियम आणि कायदे. हे नियम सर्व लोकांसाठी समान असतात. संविधानामुळे लोकशाही योग्य प्रकारे चालते.
2. भारतीय संविधानाची गरज का होती?
आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.
भारताचा राज्यकारभार भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या नियमांप्रमाणे चालावा, म्हणून संविधान तयार करण्यात आले.
संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळतात.
3. भारतीय संविधान कसे तयार झाले?
- संविधान सभा : 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान तयार करण्यासाठी एक सभा स्थापन करण्यात आली.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
- डॉ. राजेंद्रप्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते.
- संविधान लिहायला 2 वर्षे, 11 महिने आणि 17 दिवस लागले.
- संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.
4. भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये
पूर्णतः लिखित संविधान – भारताचे संविधान पूर्णपणे लिहिलेले आहे.
सर्व नागरिकांना समान हक्क – जात, धर्म, भाषा यामुळे भेदभाव होत नाही.
लोकशाही शासनपद्धती – जनता स्वतःचे नेते निवडते.
न्याय आणि स्वातंत्र्य – प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळतो आणि विचार, बोलणे व वागण्याचे स्वातंत्र्य असते.
धर्मनिरपेक्षता – कोणत्याही धर्माला विशेष अधिकार नाही. सर्व धर्म समान आहेत.
5. संविधानानुसार शासन कसे चालते?
- शासन लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत चालते.
- संसद, न्यायव्यवस्था, पोलीस आणि इतर संस्था संविधानाच्या नियमांप्रमाणे काम करतात.
- कोणताही नेता किंवा नागरिक संविधानाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही.
6. भारतीय संविधान दिन संविधान
- 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले.
- हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
- 26 जानेवारी रोजी संविधान लागू झाल्यामुळे तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात.
7. शासनाची जबाबदारी कोणती?
जनतेचे संरक्षण करणे – देशाच्या सीमांचे संरक्षण करणे आणि कायदा-सुव्यवस्था राखणे.
नागरिकांच्या गरजा पूर्ण करणे – शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते आणि रोजगार यांसाठी योजना तयार करणे.
गरीब व दुर्बल घटकांसाठी मदत – महिला, आदिवासी, मुलांसाठी विशेष योजना आखणे.
संपत्ती व संसाधनांचे योग्य वाटप – देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तींचा योग्य वापर करणे.
8. संविधानामुळे काय फायदे होतात?
- नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात.
- कायद्याचे राज्य प्रस्थापित होते.
- भ्रष्टाचार आणि अन्याय कमी होतो.
- लोकशाही मजबूत होते.
- प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळते.
9. महत्वाचे व्यक्तीमत्वे:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय संविधानाचे शिल्पकार
डॉ. राजेंद्रप्रसाद – संविधान सभेचे अध्यक्ष
पंडित जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान
सरदार वल्लभभाई पटेल – भारताच्या एकीकरणासाठी प्रयत्न करणारे नेते
Leave a Reply