Notes For All Chapters – नागरिकशास्त्र Class 7
मूलभूत हक्क भाग-२
1. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क:
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, म्हणजेच येथे प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार धर्म पाळण्याचा, पूजा करण्याचा आणि धर्मसंबंधी संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे.
सरकार विशिष्ट धर्मासाठी कर लावू शकत नाही.
शासनाच्या आर्थिक मदतीने चालणाऱ्या शाळांमध्ये कोणत्याही धर्माचे शिक्षण सक्तीचे करू शकत नाहीत.
2. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क:
- भारतात विविध भाषा, सण, परंपरा आणि संस्कृती आहेत.
- प्रत्येक गटाला त्यांची संस्कृती जपण्याचा आणि प्रचार करण्याचा हक्क आहे.
- लोकांना त्यांच्या भाषेच्या संवर्धनासाठी संस्था स्थापन करता येतात.
3. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क:
- जर कोणाचा मूलभूत हक्क भंग झाला तर तो व्यक्ती न्यायालयाकडे दाद मागू शकतो.
- न्यायालय नागरिकांचे हक्क संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे आदेश जारी करू शकते.
हक्क संरक्षणासाठी न्यायालयाचे आदेश:
बंदी प्रत्यक्षीकरण (Habeas Corpus) – बेकायदेशीर अटक आणि कैदेत टाकल्यास न्यायालय व्यक्तीला सोडण्याचा आदेश देऊ शकते.
परमादेश (Mandamus) – सरकारला नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आदेश दिला जातो.
मनाई आदेश (Prohibition) – कनिष्ठ न्यायालयाला त्यांच्या अधिकारापलीकडे जाण्यापासून रोखतो.
अधिकारपृच्छा (Quo Warranto) – सरकारी अधिकाऱ्याने कोणत्या अधिकाराने एखादी कृती केली याचा जाब विचारला जातो.
उत्प्रेक्षण (Certiorari) – कनिष्ठ न्यायालयाचा चुकीचा निर्णय रद्द केला जातो आणि प्रकरण वरिष्ठ न्यायालयाकडे पाठवले जाते.
4. हक्कभंग म्हणजे काय?
- जर कोणाला विनाकारण अटक केली गेली, बाहेर जाण्यास बंदी घातली गेली किंवा तुरुंगात योग्य सुविधा दिल्या गेल्या नाहीत तर याला हक्कभंग म्हणतात.
- अशा वेळी व्यक्तीने न्यायालयात तक्रार करू शकते.
Leave a Reply