Notes For All Chapters – सामान्य विज्ञान Class 7
भौतिक राशींचे मापन
1. भौतिक राशी म्हणजे काय?
आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी मोजतो,
उदा.
- वजन (धान्य, भाजीपाला)
 - लांबी (रस्ता, कपडे)
 - तापमान (शरीराचे तापमान)
 - वेग (गाडीचा वेग)
 
यांना भौतिक राशी म्हणतात. प्रत्येक भौतिक राशी मोजण्यासाठी एकक (unit) असते.
उदा:
- लांबी – मीटर (m)
 - वजन/वस्तुमान – किलोग्रॅम (kg)
 - वेळ – सेकंद (s)
 
2. भौतिक राशींचे प्रकार
(अ) अदिश राशी (Scalar Quantity)
ज्या राशी व्यक्त करताना फक्त संख्या आणि एकक लागतं, त्यांना अदिश राशी म्हणतात.
उदा:
- लांबी (2 मीटर)
 - तापमान (37°C)
 - वस्तुमान (5 किलोग्रॅम)
 
(ब) सदिश राशी (Vector Quantity)
ज्या राशी व्यक्त करताना संख्येबरोबर दिशा पण सांगावी लागते, त्यांना सदिश राशी म्हणतात.
उदा:
- वेग (गाडी 40 km/hr पश्चिमेकडे जात आहे.)
 - विस्थापन (5 मीटर उत्तर दिशेला)
 
3. प्रमाणित मापन (Standard Measurement)
मापन अचूक होण्यासाठी प्रमाणित एकके वापरली जातात.
प्रचलित मापन पद्धती
1. MKS पद्धत:
- लांबी – मीटर (m)
 - वस्तुमान – किलोग्रॅम (kg)
 - वेळ – सेकंद (s)
 
2. CGS पद्धत:
- लांबी – सेंटीमीटर (cm)
 - वस्तुमान – ग्रॅम (g)
 - वेळ – सेकंद (s)
 
4. मापनातील चुका व अचूकतेचे महत्त्व
मापन करताना होणाऱ्या चुका:
- चुकीचे मापन साधन वापरणे.
 - स्केल/तराजू व्यवस्थित न ठेवणे.
 - मापन साधनांचे प्रमाणन वेळच्या वेळी न करणे.
 
अचूक मापनाचे महत्त्व:
- विज्ञान व अभियांत्रिकीमध्ये अचूक मापन गरजेचे असते.
 - वजन आणि प्रमाण चुकीचे असल्यास ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.
 - इमारती, पूल यांचे बांधकाम योग्य मापनाशिवाय चुकीचे होऊ शकते.
 

Leave a Reply