Questions Answer For All Chapters – बालभारती Class 8
Solutions
फुलपाखरे
प्र. 1. वैशिष्ट्येलिहून तक्ता पूर्ण करा.
| फुलाचे नाव | देठ | पाने | फुले | 
|---|---|---|---|
| (1) झिनिया | सरळ, मजबूत आणि काहीसे चपटे | मोठी, दातेरी कड असलेली, गर्द हिरवी | विविध रंगांची मोठी, आकर्षक, चमकदार | 
| (2) पारिजातक | पातळ व थोडेसे वाकलेले | लांबट, खरखरीत व गर्द हिरवी | पांढऱ्या पाकळ्या व केशरी मध्य असलेली सुगंधी फुले | 
प्र.2. कारणे लिहा.
(अ) लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता, कारण…
उत्तर – लेखक प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला सृष्टीच्या सौंदर्यात रमता येत नव्हते.
(आ) लेखकाच्या मनावरचे मळभ दूर झाले, कारण…
उत्तर – स्टेशनवरील बागेतील सुंदर झेनियाची फुले आणि रंगीबेरंगी फुलपाखरांची चैतन्यमय हालचाल पाहून त्याचे मन आनंदित झाले.
प्र.3. योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | 
|---|---|
| (1) सृष्टी | (अ) सुफल | 
| (2) राठ दांडा | (आ) झेनिया | 
| (3) नाजूकपणा | (इ) पारिजातक | 
| (4) बहुढंगी | (ई) फुलपाखरे | 
प्र.4. पाठाच्या आधारे तुलना करा.
| फुलपाखरांचे जीवन | मानवी जीवन | 
|---|---|
| (1) फुलपाखरांचे जीवन अल्पायुषी असते, परंतु ते आनंदाने जगतात. | (1) माणसाचे जीवन दीर्घकाळ टिकते, पण तो अनेक चिंता व समस्यांमध्ये गुरफटून जातो. | 
| (2) फुलपाखरांना कुठलाही मोह नसतो; ते फुलांवर बसून आनंद घेतात. | (2) माणूस मोहात अडकतो व कधी कधी जीवनाचा आनंद घ्यायला विसरतो. | 
प्र.5. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) या पाठातून लेखकाने दिलेला संदेश.
उत्तर – जीवनात अडचणी आणि संकटे येतात, पण त्यांना सकारात्मक दृष्टीने पाहून आनंदी राहायला शिकले पाहिजे.
(आ) निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात.
उत्तर – निसर्गातील वृक्ष, वेली, फुले आणि फुलपाखरे हे मानवी जीवनात आनंद निर्माण करतात आणि संकटांवर मात करण्यासाठी प्रेरणा देतात.
प्र.6. ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ या वचनातील विचार स्पष्ट करा.
उत्तर – एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवतो की ती आपल्याला आनंददायी वाटेल की निराशाजनक. जर आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल, तर सृष्टीदेखील आनंददायी वाटते.
प्र.7. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
उत्तर – उदाहरणे:
- जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती.
 - उडताहेत ती फुले, की डोलताहेत ती फुले, अशी शंका वाटण्याइतके रंगांचे सादृश्य झेनियाच्या फुलांत नि त्या फुलपाखरांत होते.
 

Leave a Reply