Question Answers For All Chapters – इतिहास Class 8
इतिहासाची साधने – Solutions
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा:
(1) इतिहासाच्या साधनांमधील ………. साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
(अ) लिखित (ब) मौखिक
(क) भौतिक (ड) दृक्-श्राव्य
उत्तर – (ड) दृक्-श्राव्य
(2) पुण्यातील ………. या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
(अ) आगाखान पॅलेस (ब) साबरमती आश्रम
(क) सेल्युलर जेल (ड) लक्ष्मी विलास पॅलेस
उत्तर – (अ) आगाखान पॅलेस
(3) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ………. होय.
(अ) पोवाडा (ब) छायाचित्र
(क) मुलाखती (ड) चित्रपट
उत्तर – (ड) चित्रपट
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:
1. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.
उत्तर –
- ब्रिटिश काळात वृत्तपत्रे फक्त राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब नव्हते, तर ती समाजप्रबोधनासाठीही वापरण्यात आली.
 - ‘केसरी’, ‘दीनबंधु’, ‘प्रभाकर’ आणि ‘निबंधमाला’ यांसारख्या वृत्तपत्रांनी समाजातील अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि स्त्रियांवरील अन्याय यांविरुद्ध आवाज उठवला.
 - लोकहितवादी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या लेखनामुळे सामाजिक सुधारणा चळवळींना गती मिळाली.
 - त्यामुळे वृत्तपत्रे सामाजिक परिवर्तन आणि जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम बनली.
 
2. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात.
उत्तर –
- चित्रफिती म्हणजे ऐतिहासिक घटनांचे दृश्य स्वरूपात रेकॉर्ड केलेले माध्यम होय.
 - आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केल्या जाणाऱ्या या चित्रफिती वास्तववादी आणि सत्य घटनांचे जतन करण्यास मदत करतात.
 - स्वातंत्र्यलढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चलेजाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती आजही उपलब्ध आहेत.
 - या चित्रफितीमुळे त्या काळातील वस्तुस्थिती, लोकांची हालचाल, प्रसंग आणि वातावरणाचे वास्तव स्वरूप स्पष्टपणे पाहता येते.
 - चित्रफिती हे दृक-श्राव्य साधन असल्यामुळे त्या अधिक विश्वासार्ह आणि प्रभावी मानल्या जातात.
 
३. टीपा लिहा:
- छायाचित्रे:
- छायाचित्रे ही दृक-स्वरूपातील ऐतिहासिक साधने आहेत.
 - व्यक्ती, वास्तू, घटना यांची खरी परिस्थिती दर्शविण्यास मदत करतात.
 - इतिहासाच्या अभ्यासासाठी अधिक विश्वसनीय मानली जातात.
 
 - वस्तुसंग्रहालये आणि इतिहास:
- संग्रहालयांमध्ये ऐतिहासिक वस्तू, चित्रे आणि कागदपत्रे जतन करून ठेवली जातात.
 - उदा. पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये गांधीजींच्या वस्तू जतन केल्या आहेत.
 - ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संग्रहालये महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
 - श्राव्य साधने:
- ध्वनिमुद्रित भाषणे, गीते आणि आवाजांचे रेकॉर्ड्स श्राव्य साधनांचा भाग आहेत.
 - उदाहरणार्थ, रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले ‘जन गण मन’ किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भाषणे.
 - इतिहासातील व्यक्तींचे विचार व संदेश जतन करून ठेवण्यासाठी उपयोगी पडतात.
 
 
४. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा:
भौतिक साधने:
| भौतिक साधने | 
|---|
| वास्तू आणि इमारती | 
| नाणी आणि पुतळे | 
| स्मारके आणि राजवाडे | 
| ऐतिहासिक स्थळे | 

Thank you so much evidyarthi
2nd chapter question answer