Question Answers For All Chapters – इतिहास Class 8
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(1) 1 मे 1960 रोजी _____ राज्याची निर्मिती झाली.
(अ) गोवा (ब) कर्नाटक
(क) आंध्रप्रदेश (ड) महाराष्ट्र
उत्तर – (ड) महाराष्ट्र
(2) मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव _____ यांनी मांडला.
(अ) ग.त्र्यं.माडखोलकर (ब) आचार्य अत्रे
(क) द.वा.पोतदार (ड) शंकरराव देव
उत्तर – (ब) आचार्य अत्रे
(3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ______ यांनी जबाबदारी स्वीकारली.
(अ) यशवंतराव चव्हाण (ब) पृथ्वीराज चव्हाण
(क) शंकरराव चव्हाण (ड) विलासराव देशमुख
उत्तर – (अ) यशवंतराव चव्हाण
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(1) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.
उत्तर – महाराष्ट्रात मराठी भाषिक जनतेला स्वतंत्र राज्य हवे होते, परंतु तत्कालीन केंद्र सरकारने मुंबईला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठा विरोध निर्माण झाला. महाराष्ट्र व गुजरात हे स्वतंत्र राज्य करावेत म्हणून 6 फेब्रुवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. या समितीने मोठे आंदोलन उभारले आणि अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली.
(2) संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती.
उत्तर – संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती कारण या चळवळीमध्ये जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रांनी मोठे योगदान दिले. प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लोकांमध्ये जागृती केली.
विशेषतः आचार्य अत्रे यांच्या “मराठा” वृत्तपत्राने या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी “मावळा” या टोपणनावाने व्यंगचित्रे काढून आंदोलन अधिक प्रभावी केले.
शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, आणि शाहीर द.ना. गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून लोकभावना चेतवून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे वृत्तपत्रे आणि शाहिरांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची मागणी अधिक व्यापक बनली आणि आंदोलनाला बळ मिळाले
३. टीपा लिहा.
(1) संयुक्त महाराष्ट्र परिषद:
उत्तर – 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरली. या परिषदेत संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्यासाठी ठराव संमत करण्यात आला.
(2) संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान:
उत्तर – ही समिती महाराष्ट्र निर्मितीसाठी प्रभावीपणे कार्यरत होती. सेनापती बापट, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, डांगे यांसारख्या नेत्यांनी नेतृत्व केले. त्यांनी विविध आंदोलन, मोर्चे, संपाद्वारे सरकारवर दबाव टाकला आणि अखेर महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात यश आले.
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
संयुक्त महाराष्ट्र समिती |
---|
अध्यक्ष: कॉ. श्रीपाद अमृत डांगे |
उपाध्यक्ष: डॉ. त्र्यं.रा. नरवणे |
सचिव: एस.एम. जोशी |
उपक्रम: आंदोलन, मोर्चे, संप, पत्रके, सभा |
Leave a Reply