Solution For All Chapters – भूगोल Class 10
प्रश्न १. खालील विधाने योग्य की अयोग्य तेलिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.
(अ) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
उत्तर – ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे- योग्य
(आ) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
उत्तर – भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे- अयोग्य
दुरुस्त विधान: भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे.
(इ) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.
उत्तर – ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे- अयोग्य
दुरुस्त विधान: ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे.
(ई) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
उत्तर – ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते- योग्य
(उ) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.
उत्तर – ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे- अयोग्य
दुरुस्त विधान: ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे.
(ऊ) भारताच्या अाग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
उत्तर – भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे- अयोग्य
दुरुस्त विधान: भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
(ए) भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात.
उत्तर – भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात- योग्य
प्रश्न २. थोडक्यात उत्तरेलिहा.
(अ) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?
उत्तर – स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड दयावे लागले:
(१) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.
(२) स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.
(३) स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड दयावे लागले.
(४) स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड दयावे लागले.
(आ) भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत?
उत्तर – भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत:
(१) भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे.
(२) ब्राझील स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे.
(३) भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.
(४) ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.
(इ) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.
उत्तर – (अ) भारत:
अक्षवृत्तीय विस्तार: भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४’ उत्तर अक्षवृत्त ते ३७°६’ उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५’ अक्षावरील ‘इंदिरा पॉइंट’ हे भारताचे अति दक्षिण टोक आहे.
रेखावृत्तीय विस्तार: भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७’ पूर्व रेखावृत्त ते ९७°२५’ पूर्व रेखावृत्त आहे.
(ब) ब्राझील:
अक्षवृत्तीय विस्तार: ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५’ उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५ दक्षिण अक्षवृत्त आहे.
रेखावृत्तीय विस्तार: ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५’ पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८’ पश्चिम रेखावृत्त आहे.
प्रश्न ३. अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा.
(अ) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक …….. नावाने ओळखले जाते.
(i) लक्षद्वीप
(ii) कन्याकुमारी
(iii)इंदिरा पॉईंट
(iv) पोर्ट ब्लेअर
उत्तर – भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट नावाने ओळखले जाते.
(आ) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.
(i) चिली-इक्वेडोर
(ii) अर्जेंटिना-बोलिव्हिया
(iii) कोलंबिया-फ्रेंच गियाना
(iv) सुरीनाम-उरुग्
उत्तर – चिली-इक्वेडोर
(इ) दोन्ही देशांतील राजवट ………… प्रकारची आहे.
(i) लष्करी
(ii) साम्यवादी
(iii) प्रजासत्ताक
(iv) अध्यक्षीय
उत्तर – दोन्ही देशांतील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे.
(ई) खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो?
उत्तर – (i)
(उ) खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो?
उत्तर – (iii)
(ऊ) गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे?
उत्तर – (iii)
(ए) गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे?
उत्तर – (ii)
Very nice 👍👍
Nice
I like it but extra questions
sahil ok
Thanks sir
Thanks sir
It is very helpful to me thanks…✨💗
Nice😇
very nice
👍👍
👍👍
thanks
very nice 💯👌 एफ जून
Va va
Va va nahi just very good
It’s very good
But are you a girl or boy?
Thanks mam’s
Veryy nice miss/sirr👍🏻
Its important 👌👌
Perfect 👌 answer
Very nice 👍👍
All nice
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice
Exercise is very good and all questions are right and short answer. 👌
Nice 👍🏻
Very useful👌👌👌
wow very good 👍
अति उत्तम
Thanks
thank you 🙏 sir
Exlent work
very nice 👌🏻👍
धन्यवाद