eVidyarthi
Menu
  • School
    • Close
    • CBSE English Medium
    • CBSE Hindi Medium
    • UP Board
    • Bihar Board
    • Maharashtra Board
    • MP Board
    • Close
  • Sarkari Exam Preparation
    • Close
    • Notes For Competitive Exams
    • MCQs for Competitive Exams
    • All Govt Exams Preparation
    • NCERT Syllabus for Competitive Exam
    • Close
  • Study Abroad
    • Close
    • Study in Australia
    • Study in Canada
    • Study in UK
    • Study in Germany
    • Study in USA
    • Close
Geography Class 10 Maharashtra | Menu
  • MCQ Bhugol Class 10 Maharashtra Board
  • स्वाध्याय Bhugol Class 10 Maharashtra Board
  • Book Bhugol Class 10 Maharashtra Board
  • Question Answers Bhugol Class 10 Maharashtra Board
  • Notes Bhugol Class 10 Maharashtra Board
  • Important Questions Bhugol Class 10 Maharashtra Board
  • Bhugol Class 10

मराठी इयत्ता १० वी Chapter 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली Bhugol Solution महाराष्ट्र Board Marathi

Solution For All Chapters – भूगोल Class 10

प्रश्न १. अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा.

(अ) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ……

(i) उच्चभूमीचा आहे.
(ii) मैदानी आहे.
(iii) पर्वतीय आहे.
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे.

उत्तर – ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे.

(आ) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा ……

(i) उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(iii) पश्चिमवाहिनी नद्या आहेत.
(iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत

उत्तर – भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे.

(इ) ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ……

(i) अवर्षणग्रस्त आहे.
(ii) दलदलीचे आहे.
(iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(iv) सुपीक आहे.

उत्तर – ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

(ई) ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत……

(i) त्रिभुज प्रदेश आहे.
(ii) त्रिभुज प्रदेश नाही.
(iii) विस्तीर्ण खाड्या आहेत.
(iv) मासेमारी व्यवसाय केला जातो.

उत्तर – ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही.

(उ) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटेही……

(i) मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत.
(ii) प्रवाळबेटे आहेत.
(iii) ज्वालामुखीय बेटे आहेत.
(iv) खंडीय बेटे आहेत.

उत्तर – अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत.

(ऊ) अरवली पर्वताच्या पायथ्याशी ……

(i) बुंदेलखंड पठार आहे.
(ii) मेवाड पठार आहे.
(iii) माळवा पठार आहे.
(iv) दख्खनचे पठार आहे.

उत्तर – अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे.

प्रश्न २. खालील प्रश्नांची उत्तरेलिहा

(अ) भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.

उत्तर 1 –

1. भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच विभाग केले जातात. याउलट, ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह पाच प्राकृतिक विभाग केले जातात.
2. भारतात विविध भागांत उंच पर्वत आढळतात. याउलट, ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाहीत.
3.भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे. भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत.
4. भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा ७००० मीटर ते ८००० मीटर आहे. याउलट, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा १००० मीटर ते २००० मीटर आहे.
5. भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाचा उष्ण वाळवंटी प्रदेश नाही.
6. भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात. याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत.
7. भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पश्चजलाचे प्रदेश आढळतात. असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाहीत.
8. ब्राझीलमध्ये अजस्र कडा आढळतो. ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. याउलट, भारतात पठारांची सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजस्र कडे आढळत नाहीत.

उत्तर 2 –

भारतब्रझील
1. पर्वतीय प्रदेशभारताच्या उत्तरेला सर्वाधिक उंचीचा हिमालय पर्वतरांगांचा प्रदेश असून ‘के-२’ हे सर्वाधिक उंचीचे शिखर (उंची ८६८१ मी) आहे. या पर्वतरांगा पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरल्या आहेत. भारतीय द्वीपकल्पीय प्रदेशाच्या दोन्ही बाजूला डोंगर असून त्यांना पूर्व आणि पश्चिम घाट म्हणून ओळखले जाते.ब्रझीलमध्ये पर्वतीय प्रदेश नाही; दक्षिण ब्रझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापला आहे; मात्र उत्तरेकडे गियाना उच्चभूमीवर ब्रझीलमधील सर्वोच्च शिखर ‘पिको दी नेब्लीना’ (उंची ३०१४ मी) आहे.
2. मैदानी प्रदेशभारतात उत्तरेला हिमालयाचा पायथा ते भारतीय द्वीपकल्पापर्यंत सपाट व सुपीक प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला असून या प्रदेशाचा उतार सर्वसाधारणपणे पूर्व दिशेने आहे. सुंदरबन हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश गंगा नदीच्या मुखाजवळ आहे.ब्रझीलमध्ये मैदानी प्रदेश उत्तरेकडील ॲमेझॉन खोर्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराना, पॅराग्वे नद्यांचा भाग या दोन विभागांत दिसून येतो. ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश हा विस्तीर्ण मैदानी प्रदेश असून याचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन खोरे ब्रझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद (१३०० किमी) आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्ण कटिबंधीय वर्षावने आहेत.
3. पठारी प्रदेशउत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यांत अनेक पठारांची शृंखला व डोंगररांगा आहेत. यांत उत्तरेकडील अरवली हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्यभागातील विंध्य-सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.ब्रझीलमध्ये दक्षिणेकडे प्रामुख्याने विस्तीर्ण पठारी प्रदेश असून हा ब्रझीलची उच्चभूमी किंवा ढालक्षेत्र म्हणून ओळखला जातो.
4. किनारी प्रदेशभारताच्या पश्चिम, दक्षिण व पूर्व दिशेने अनुक्रमे अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालचा उपसागर हे विस्तीर्ण जलाशय आहेत. भारतीय किनारपट्टीचे पूर्व व पश्चिम किनारपट्टी असे दोन भाग पडतात आणि पश्चिम किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी यांच्यात विषमता आढळते.ब्रझीलला उत्तरेकडे उत्तर अटलांटिक महासागर व पूर्व व आग्नेयकडे दक्षिण अटलांटिक महासागराचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. उत्तरेकडील किनारी भाग सखल असून येथे अनेक बेटे आहेत, तर पूर्व किनारीभागात अनेक पुळणे आहेत.
5. द्वीपसमूहअरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप व बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार हे मोठे द्वीपसमूह आहेत. लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत, तर बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटे ही ज्वालामुखीय बेटे आहेत.माराजॉ हे मोठे किनारी बेट ब्रझीलच्या उत्तर किनाऱ्यावर आहे.

(आ) भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?

उत्तर – भारतामध्ये नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत.

1. नदी खोऱ्यांच्या प्रदेशात असणाऱ्या कारखाने व उद्योगांमधील सांडपाणी नदीमध्ये सोडण्यापूर्वी त्यांच्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे.
2. ‘राष्ट्रीय नदी संवर्धन योजना’ अंतर्गत (‘NRCP’) देशातील अनेक नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता शासकीय पातळीवर निधी निश्चित केला आहे. उदा. नदीतील परिसंस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्न हा गंगा नदीच्या व तिच्या अनेक उपनद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता ‘गंगा कृती योजना’ कार्यक्रम शासनाने आखला आहे. तसेच, निर्माल्यदेखील नदीच्या पाण्यात टाकले जाऊ नये, म्हणून नदीकिनारी मोठ्या कुंभाची सोय केली आहे.
3. स्थानिक स्तरावरही प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सांडपाण्यासंदर्भात शासनाने नियम केले आहेत.
4. तसेच, शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय शेतीवर भर देण्यासाठी शासनाने प्रोत्साहन दिले आहे.

(इ) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर – भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:

1. भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.
2. हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे.
3. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात.
4. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.
5. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास ‘सुंदरबन’ म्हणतात हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
6. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश ‘थरचे वाळवंट’ किंवा ‘मरुस्थळ’ या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.
7. अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे.
8. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.

(ई) पॅंटानल या अतिविस्तृत खंडातर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?

उत्तर – पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची पुढील कारणे असावीत:

1. पँटानल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात.
2. या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारांवरून वाहणारे पाणी जमा होते.
3. पँटानल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनदयांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते.
4. मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते.

(उ) भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तर – भारतीय द्वीपकल्पीय भागामध्ये भारतातील प्रमुख जलविभाजक आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत.

(i) पश्चिम घाट –
1. भारतीय द्वीपकल्पाच्या भागात पश्चिमेकडील भागात दक्षिणोत्तर पसरलेली पर्वतांची रांग ही पश्चिम घाट म्हणून ओळखली जाते.
2. या प्रदेशात अनेक पश्चिमवाहिनी नद्या व गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादी पूर्ववाहिनी नद्या उगम पावतात.

(ii) अरवली पर्वतरांगा –
1. भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील भागात नैऋत्य-ईशान्य दिशेने अरवली पर्वतरांगा पसरल्या आहेत.
2. या पर्वतरांगांच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी नैऋत्य दिशेने कच्छच्या रणाकडे वाहत येते, तर बनास ही चंबळ नदीची उपनदी ईशान्य दिशेने वाहत जाते.
यामुळे, अरवली पर्वतरांगांनादेखील जलविभाजक म्हणता येते.

(iii) विंध्य पर्वतरांगा: विंध्य पर्वत गंगानदी खोरे व नर्मदा नदी खोरे विलग करते.
(iv) सातपुडा पर्वतरांग: सातपुडा पर्वतरांग नर्मदा नदी खोरे व तापी नदीचे खोरे विलग करते.
(v) हिमालय पर्वतरांगा: हिमालय पर्वतरांगा हिमालयातील काही नद्या व हिमालयापलीकडील रांगांतून वाहणाऱ्या नद्यांना विलग करत असल्याने हिमालय जलविभाजकाची भूमिका बजावतो असे म्हणता येते.

प्रश्न ३. टिपा लिहा.

(अ) ॲमेझॉन नदीचे खोरे

उत्तर –
1. ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वांत मोठा मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानाचा) सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.
2. ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद, म्हणेजच सुमारे १३०० किमी रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ २४० किमी होते.
3. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते, तसतशी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची (मैदानाची) रुंदी वाढत जाते.
4. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) प्रदेश दुर्गम बनला आहे.

(आ) हिमालय

उत्तर –
1. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत उत्तर-ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे.
2. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून, हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही हिमालय पर्वतश्रेणीतील सर्वांत दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वांत नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे.
3. दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) आणि हिमालय पलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत.
4. हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊँ हिमालय) आणि पूर्व हिमालय (असम हिमालय) असेही भाग केले जातात.

(इ) ब्राझीलची किनारपट्टी

उत्तर –
1. ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टी उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात.
2. उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्तेपर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो.
3. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजॉ हे किनारी बेट ॲमेझॉन व टोकँटिस या नदयांच्यादरम्यान तयार झाले आहे.
4. ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नद्या येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळण व तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळ कट्टा आणि प्रवाळ बेटे यांमुळे रक्षण होते.

(ई) भारताचा द्वीपकल्पीय विभाग

उत्तर –
1. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो.
2. भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे.
3. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे. पठारांच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक तेलगंणा पठार, छोटा नागपूर पठार, पूर्वेचे पठार इत्यादी महत्त्वाची पठारे आहेत. या विभागाच्या मध्य भागात विंध्य-सातपुडा पर्वत आहेत.
4. भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.

(उ) अजस्र कडा

उत्तर –
1. क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अजस्र कडा हा ब्राझीलमधील सर्वांत लहान प्राकृतिक विभाग आहे.
2. सावो पावलो ते पोत्तो ॲलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते. त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो. ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस्र कड्यामुळे अंकित होते. अजस्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची ७९० मीटर इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते.
3. अजस्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो.
4. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो.
5. अजस्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातविन्मुख प्रदेश (पर्जन्यछायेचा प्रदेश) आढळतो. हा भाग ‘अवर्षण चतुष्कोन’ म्हणून ओळखला जातो.

प्रश्न ४. भौगोलिक कारणेलिहा.

(अ) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.

उत्तर –
1. ब्राझीलच्या नकाशाचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते, की ब्राझीलच्या उत्तर व पूर्वेकडील किनाऱ्याला लागून अनुक्रमे उत्तर अटलांटिक व दक्षिण अटलांटिक महासागर आहेत.
2. ब्राझीलच्या प्राकृतिक विभागाचा विचार करता दक्षिणेकडे ब्राझील पठाराचा विस्तीर्ण भाग आहे. उत्तरेकडे ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. सर्वच नद्या भूउताराला अनुसरून सामान्यत: उत्तरेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळतात. ब्राझीलच्या उच्चभूमीवर उगम पावणारी सावो फ्रान्सिस्को ही नदी उत्तरेकडे वाहते, पुढे पूर्वेकडे वळून ती अटलांटिक महासागराला मिळते.
3. याशिवाय, ब्राझीलमधील सर्वांत मोठी नदी ‘ॲमेझॉन’ ही सुद्धा ब्राझीलच्या पश्चिमेकडील पेरू या देशात असणाऱ्या अँडीज पर्वताच्या भागात उगम पावते व उताराला अनुसरून ही नदी पूर्वेकडे वाहत येऊन उत्तर अटलांटिक महासागराला मिळते.
4. तसेच, ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून उगम पावणाऱ्या पेराग्वे, पॅराना व उरुग्वे या नद्या ब्राझीलच्या नैऋत्येकडील भागातून वाहत जातात.
ब्राझीलमधील नदीप्रणाली अभ्यासता ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.

(आ) भारताच्या पश्चिम व पूर्वकिनारपट्‌ट्यांमध्येविषमता आढळते.

उत्तर –
1. पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदी तुलनेने कमी आहे.
2. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.
3. भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अशा प्रकारे, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.

(इ) भारताच्या पूर्वकिनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

उत्तर –
1. भारताचा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून असून हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे.
2. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम व पूर्व घाटातून येऊन मिळतात. जमिनीच्या मंद उतारामुळे त्यांचा वेग कमी असतो. त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे किनाऱ्यावर संचयन होऊन नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात, हा किनारा उथळ बनला आहे.
3. नैसर्गिक बंदराकरता खोल व दंतूर किनारा हे घटक महत्त्वाचे असतात; मात्र ही भौगोलिक स्थिती पूर्व किनाऱ्यावर आढळत नाही.
परिणामी, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

(ई) ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.

उत्तर –
1. ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
2. या भागात उदयोगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते.
3. गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते.
त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.

प्रश्न ५. अचूक गट ओळखा.

(अ) ब्राझीलच्या वायव्येकडून अाग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
(i) पॅराना नदी खोरे-गियाना उच्चभूमी-ब्राझील उच्चभूमी
(ii) गियाना उच्चभूमी-ॲमेझॉन खाेरे-ब्राझील उच्चभूमी
(iii) किनारपट्टीचा प्रदेश-ॲमेझॉन खोरे-ब्राझील उच्चभूमी

उत्तर – (ii) गियाना उच्चभूमी-ॲमेझॉन खाेरे-ब्राझील उच्चभूमी

(आ) ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.
(i) जुरुका-झिंगू-अरागुआ
(ii) निग्रो-ब्रांकाे-पारु
(iii) जापुरा-जारुआ-पुरुस

उत्तर – (i) जुरुका-झिंगू-अरागुआ

(इ) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारेक्रमवार आढळतात.
(i) कर्नाटक-महाराष्ट्र-बुंदेलखंड
(ii) छोटा नागपूर-माळवा-मारवाड
(iii) तेलंगणा-महाराष्ट्र-मारवाड

उत्तर – (i) कर्नाटक-महाराष्ट्र-बुंदेलखंड

Comments

  1. Harshu says:
    July 10, 2024 at 3:24 pm

    That’s good 👍🏻

    Reply
  2. Tanuja says:
    August 11, 2024 at 5:02 pm

    thanks… 🙏🙏🙏🙏

    Reply
    • MAYURI SUTAR says:
      January 20, 2025 at 2:41 pm

      Very interesting

      Reply
    • Surendra says:
      July 16, 2025 at 9:50 pm

      intresting😀😀😀😀😀😀😀😀😀😀😉😀😀🤠🤠👻👽👾☠️😎🤒🤕🤒🤧🤧🤒🤒🤒😫🤧🤧🤧🤒🤒😎😎🤕💯🎉🎊🤎💜💜⚡👤🦴👀👀🦿🦾👐🖐️🤌👊🙌👐🤌🤌🖐️🤌🤜🙌🏋️🏇🤽🏊🧛👰🧑‍🚀🧑‍🔧🧑‍🎤👮🧑‍🌾🧓👳🧕🧑‍🦰🧑‍🦳👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨🌳🪵🌲☃️🌤️🌞🌘🌗🐇🐉🦕🐗🦇🪶🪶🦩🦃🦉🦔🐅🐆🦂🐚🦞🦀🍌🍋🍑🍐🥦🥑🥝🥘🥨🍝🍝🥘🥙🥙🍧🥧🍘🍙🍨⛽🛴🚚🚜🚁🚀🚀🛸🚡🚡💈🎢🏫

      Reply
  3. Durgesh Bachhav says:
    September 22, 2024 at 4:14 pm

    Very good 👍😊

    Reply
  4. Karan mali says:
    September 26, 2024 at 1:33 pm

    Like

    Reply
  5. Aasha ahire says:
    October 3, 2024 at 3:37 pm

    Thank you

    Reply
  6. Arti says:
    October 20, 2024 at 8:12 am

    Thanks 👍

    Reply
  7. VASIM ATTAR says:
    November 10, 2024 at 3:48 pm

    IS THIS COMING FOR SSC BOARD EXAM ?

    Reply
    • Shruti jagadale says:
      March 16, 2025 at 6:07 pm

      yes thanks 😊

      Reply
  8. Shreya Shirsath ❤️ says:
    November 11, 2024 at 11:40 am

    Very good

    Reply
  9. Gaurav Dhanivle says:
    November 29, 2024 at 1:45 pm

    Very helpful thanks

    Reply
  10. Sabiya says:
    January 3, 2025 at 1:44 pm

    Very good

    Reply
  11. Anuja says:
    January 23, 2025 at 2:29 pm

    All IMP question send please

    Reply
  12. Sanket says:
    March 16, 2025 at 9:18 pm

    very easy to learn thy also free thank you for free learning materials

    Reply
  13. Mizba says:
    March 17, 2025 at 5:02 am

    very 👍

    Reply
  14. Samaira says:
    June 19, 2025 at 7:48 am

    Good 👍

    Reply
  15. Prachi vishwakarma says:
    July 22, 2025 at 8:53 am

    It was so helps my study

    Reply
  16. Krushna says:
    July 27, 2025 at 5:26 pm

    good 😊💯

    Reply
  17. Gagan says:
    August 5, 2025 at 9:33 pm

    thanku

    Reply
  18. Shravani mokase says:
    August 27, 2025 at 7:01 pm

    Thank you.. ❤️

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads

HSC Maharashtra – Marathi Medium – Maharashtra Board

📘 Maharashtra Board Exam Resources (Marathi Medium)

  • Maharashtra Board Question Banks (Marathi)
  • Maharashtra Board Sample Papers in Marathi Medium
  • Previous Year Question Papers – Marathi Medium
  • Marathi Notes and Practice Mock Tests for SSC/HSC
  • Includes MCQs (Multiple Choice Questions) in Marathi
  • All resources are available in Marathi Medium

📗 Maharashtra Board Textbooks & PDFs (Marathi Medium)

  • 10th Standard Textbook PDF in Marathi
  • Class-wise Textbook PDF (Marathi Medium)
  • Marathi Digest in PDF
  • SSC/HSC Class Books in Marathi PDF
  • Downloadable PDFs - Marathi Education Board

📒 Marathi Study Material for Maharashtra Board

  • Notes in Marathi
  • Chapter-wise Question & Answer (Solutions) in Marathi
  • Important Questions for SSC – Marathi Medium
  • Summary Important Formulas
  • MCQ's, Question Bank, Sample Papers, Previous Year Paper for cxlass 6th to 12th Std for Maharstra Board

क्लास की बुक (पुस्तक), MCQ, नोट्स इन हिंदी

Download एनसीईआरटी सलूशन, सैंपल पेपर, प्रश्न पत्र इन पीडीएफ

CBSE, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान & हरियाणा Board हिंदी माध्यम

कक्षा 6 to 8 हिंदी माध्यम
कक्षा 9 & 10 हिंदी माध्यम
कक्षा 11 हिंदी माध्यम

State Board

यूपी बोर्ड 6,7 & 8
बिहार बोर्ड हिंदी माध्यम

CBSE Board

Mathematics Class 6
Science Class 6
Social Science Class 6
हिन्दी Class 6
सामाजिक विज्ञान कक्षा 6
विज्ञान कक्षा 6

Mathematics Class 7
Science Class 7
SST Class 7
सामाजिक विज्ञान कक्षा 7
हिन्दी Class 7

Mathematics Class 8
Science Class 8
Social Science Class 8
हिन्दी Class 8

Mathematics Class 9
Science Class 9
English Class 9

Mathematics Class 10
SST Class 10
English Class 10

Mathematics Class XI
Chemistry Class XI
Accountancy Class 11

Accountancy Class 12
Mathematics Class 12

Learn English
English Through हिन्दी
Job Interview Skills
English Grammar
हिंदी व्याकरण - Vyakaran
Microsoft Word
Microsoft PowerPoint
Adobe PhotoShop
Adobe Illustrator
Learn German
Learn French
IIT JEE

Study Abroad

Study in Australia: Australia is known for its vibrant student life and world-class education in fields like engineering, business, health sciences, and arts. Major student hubs include Sydney, Melbourne, and Brisbane. Top universities: University of Sydney, University of Melbourne, ANU, UNSW.

Study in Canada: Canada offers affordable education, a multicultural environment, and work opportunities for international students. Top universities: University of Toronto, UBC, McGill, University of Alberta.

Study in the UK: The UK boasts prestigious universities and a wide range of courses. Students benefit from rich cultural experiences and a strong alumni network. Top universities: Oxford, Cambridge, Imperial College, LSE.

Study in Germany: Germany offers high-quality education, especially in engineering and technology, with many low-cost or tuition-free programs. Top universities: LMU Munich, TUM, University of Heidelberg.

Study in the USA: The USA has a diverse educational system with many research opportunities and career advancement options. Top universities: Harvard, MIT, Stanford, UC Berkeley

CBSE Board English Medium

  • Class 6 CBSE Board
  • Class 7 CBSE Board
  • Class 8 CBSE Board
  • Class 9 CBSE Board
  • Class 10 CBSE Board
  • Class 11 CBSE Board
  • Class 12 CBSE Board
  • CBSE Board Hindi Medium

  • Class 6 CBSE Board
  • Class 7 CBSE Board
  • Class 8 CBSE Board
  • Class 9 CBSE Board
  • Class 10 CBSE Board
  • Class 11 CBSE Board
  • Class 12 CBSE Board
  • बिहार बोर्ड
  • Class 6 Bihar Board
  • Class 7 Bihar Board
  • Class 8 Bihar Board
  • Class 9 Bihar Board
  • Class 10 Bihar Board
  • Class 11 Bihar Board
  • Class 12 Bihar Board
  • उत्तर प्रदेश बोर्ड
  • Class 6 UP Board
  • Class 7 UP Board
  • Class 8 UP Board
  • Class 9 UP Board
  • Class 10 UP Board
  • Class 11 UP Board
  • Class 12 UP Board
  • महाराष्ट्र बोर्ड
  • Class 6 Maharashtra Board
  • Class 7 Maharashtra Board
  • Class 8 Maharashtra Board
  • Class 9 Maharashtra Board
  • Class 10 Maharashtra Board
  • Class 11 Maharashtra Board
  • Class 12 Maharashtra Board
  • मध्य प्रदेश बोर्ड
  • Class 6 MP Board
  • Class 7 MP Board
  • Class 8 MP Board
  • Class 9 MP Board
  • Class 10 MP Board
  • Class 11 MP Board
  • Class 12 MP Board

ગુજરાત બોર્ડ

  • Class 6 Gujarat Board
  • Class 7 Gujarat Board
  • Class 8 Gujarat Board
  • Class 9 Gujarat Board
  • Class 10 Gujarat Board
  • Class 11 Gujarat Board
  • Class 12 Gujarat Board

PSC Exam Preparation

  • Uttar Pradesh PSC Exam Preparation (UPPSC)
  • Bihar PSC Exam Preparation (BPSC)
  • Madhya Pradesh PSC Exam Preparation (MPPSC)
  • Rajasthan PSC Exam Preparation (RPSC)
  • Maharashtra PSC Exam Preparation (MPSC)
Privacy Policies, Terms and Conditions, Contact Us
eVidyarthi and its licensors. All Rights Reserved.