Solution For All Chapters – भूगोल Class 10
प्रश्न १. खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.
बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्राँडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.
प्रदेश | भारत | ब्राझील |
जास्त पावसाचे | ||
मध्यम पावसाचे | ||
कमी पावसाचे |
उत्तर –
प्रदेश | भारत | ब्राझील |
जास्त पावसाचे | पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा, पूर्व महाराष्ट्र | ॲमेझोनास, रिओ ग्राँडे दो सुल |
मध्यम पावसाचे | पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेश | सांता कॅटरिना, रोराईमा |
कमी पावसाचे | बिहार, राजस्थान पश्चिम भाग, गुजरात | टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पराईबा, रिओ ग्राँडे दो नॉर्ते |
प्रश्न २. चूक की बरोबर तेलिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
(अ) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
उत्तर – ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो- बरोबर
(आ) ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ॠतू असतात.
उत्तर – ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असतात- चूक
दुरुस्त विधान: ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असू शकत नाहीत.
(इ) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळेहोतात.
उत्तर – भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात- बरोबर
(ई) ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
उत्तर – ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो- चूक
दुरुस्त विधान: ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
प्रश्न ३. भौगोलिक कारणेलिहा.
(अ) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
उत्तर –
1. दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात.
2. हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते.
3. ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते; परंतु, विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
(आ) ब्राझीलमध्येनियमित हिमवर्षाव होत नाही.
उत्तर –
1. ब्राझील हा उष्ण कटिबंधीय देश आहे.
2. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असून उष्ण ते समशीतोष्ण असे विविध प्रकारचे हवामान आढळते.
3. ब्राझीलचे वार्षिक सरासरी तापमान १८° ते २८° से. इतके आहे. म्हणजेच, हिमवृष्टी होण्याइतके तापमान येथे आढळत नाही.
4. काही वेळेस दक्षिण धुव्रीय वाऱ्यांमुळे ब्राझीलमध्ये हिमवृष्टी होते; परंतु ही घटना अकस्मितपणे व क्वचितच घडते. यावरून असे म्हणता येते, की ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
(इ) भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.
उत्तर –
1. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते. अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागांवर पडतो.
2. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते. उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. शिवाय उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो.
3. परंतु, भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही. त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.
(ई) ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
उत्तर –
1. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही.
2. या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते.
3. या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
(उ) मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.
उत्तर –
1. मॅनॉस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे.
2. या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात.
3. परिणामी, मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही. म्हणून, मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.
(ऊ) ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
उत्तर –
1. भारतात प्रामुख्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैर्ऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात.
2. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात.
3. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो.
अशा प्रकारे, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
प्रश्न ४. खालील प्रश्नांची उत्तरेलिहा.
(अ) दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.
उत्तर – दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत:
1. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते.
2. उदा., दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान २५° से ते ३०° से असते. याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान ५° से ते १०° से असते.
3. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते.
4. उदा., दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे ४१० मिमी असते. याउलट, उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे २५० मिमी असते.
(आ) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
उत्तर –
1. हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून (पर्जन्य) निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो.
2. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशांत उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
3. हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नित्य दिशेकडून वारे वाहू लागतात.
4. नैर्ऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो.
5. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात.
त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो.
6. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात.
7. नैत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात.
8. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो.
(इ) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.
उत्तर 1 –
1. ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात.
2. विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. याउलट, ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
3. ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५°से ते २८°से आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.
4. ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी २००० मिमी, तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमी पर्जन्य पडते.
5. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते.
6. अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
7. ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो.
8. ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमान तुलनेने अधिक असते. हा प्रदेश ‘पर्जन्यछायेचा प्रदेश ‘ किंवा ‘अवर्षण चतुष्कोन’ म्हणून ओळखला जातो.
उत्तर 2 –
1. अक्षवृत्तीय विस्तार: ब्राझीलच्या हवामानात विविधता आढळून येते. याचे मुख्य कारण म्हणजे ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे. ब्राझीलच्या दक्षिणेस उत्तरेच्या तुलनेत कमी तापमान असते. तसेच, काही वेळा आकस्मित परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांमुळे या भागात बर्फवृष्टीदेखील होते.
2. विषुववृत्त: ब्राझीलचा उत्तर भाग विषुववृत्तीय प्रदेशात मोडतो. येथे वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे, वर्षभर तापमान अधिक असते. तसेच, येथे वर्षभर अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. त्यामुळे, या भागातील हवामान उष्ण दमट असते.
3. अजस्र कडा: ब्राझीलमध्ये आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय (व्यापारी) वाऱ्यांपासून पाऊस मिळतो; अजस्र कड्यामुळे किनारीभागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ईशान्येस या वार्यांचा प्रभाव कमी झाल्याने तेथे पर्जन्यछायेचा प्रदेश दिसून येतो.
4. व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा क्षीण पट्टा: विषुववृत्तीय प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. तसेच, या भागात व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा क्षीण असल्याने वादळे फार क्वचित होतात.
5. उच्चभूमी व सागरी किनारा: उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड आहे आणि पूर्वेस अटलांटिक महासागर असल्याने किनारपट्टीच्या प्रदेशातील हवामान सौम्य व आर्द्र आहे.
अशारीतीने, ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार व याबरोबरच प्राकृतिक रचना हे घटक हवामानावर परिणाम करताना दिसतात.
(ई) भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.
उत्तर – भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे:
1. भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
2. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
3. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
4. सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.
प्रश्न ५. इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा.
उत्तर – ब्राझीलिया आणि भोपाळचे सरासरी मासिक तापमान खालीलप्रमाणे आहे.
महिने | ब्राझीलिया | भोपाळ |
जानेवारी | २८° / १८°१४ | २५° / ११° |
फेब्रुवारी | २८° / १८° | २८° / १३° |
मार्च | २८° / १८° | ३४° / १८° |
एप्रिल | २८° / १७° | ३८° / २२° |
मे | २७° / १५° | ४१° / २६° |
जून | २६° / १२° | ३७° / २६° |
जुलै | २६° / १२° | ३0° / २४° |
ऑगस्ट | २८° / १३° | २९° / २३° |
सप्टेंबर | ३0° / १६° | ३१° / २२° |
ऑक्टोबर | २९° / १८° | ३२° / १९° |
नोव्हेंबर | २८° / १८° | २९° / १५° |
डीसेंबर | २८° / १८° | २६° / १२° |
वर नमूद केलेल्या डेटामध्ये दोन्ही ठिकाणी उच्च/कमी तापमानचा उल्लेख केलेला आहे
भोपाळ:
(i) उष्णकटिबंधीय हवामान
(ii) सर्वात कोरडा महिना – एप्रिल
(iii) सर्वाधिक पाऊस – ऑगस्ट
(vi) सर्वात उबदार महिना – मे
(v) सरासरी तापमान – सुमारे २५ डिग्री सेल्सिअस
ब्राझीलिया:
(i) उष्णकटिबंधीय हवामान
(ii) सर्वात कोरडा महिना – जून
(iii) सर्वाधिक पाऊस – जानेवारी
(vi) सर्वात उबदार महिना – सप्टेंबर
(vi) सरासरी तापमान – सुमारे २५ डिग्री सेल्सिअस
helpful
Very nice Google 👍👍
Nice
आठ
Acha he
It’s OK and very helpful so nice
hello
It’s really helpful to us👍🏻
Very nice
Its a really helpful to us
Hello sir
मला ५व्या धड्याचा स्वाध्याय पाहिजे
Thanks sir
muje 10 vi ka 11 part cahiye
its very helpful for mh board student thank you