१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ……….. यास म्हणता येईल.
(अ) व्हॉल्टेअर
(ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड रांके
(ड) कार्ल मार
उत्तर – (अ) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.
(२) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ………. याने लिहिला.
(अ) कार्ल मार्क्स
(ब) मायकेल फुको
(क) लुसिआँ फेबर
(ड) व्हॉल्टेअर
उत्तर – (ब) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा
(१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल – रिझन इन हिस्टरी
(२) लिओपॉल्ड व्हॉन रांके – द थिअरी अँड
प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी
(३) हिरोडोटस – द हिस्टरिज्
(४) कार्ल मार्क्स – डिस्कोर्स ऑन द मेथड
उत्तर – कार्ल मार्क्स – डिस्कोर्स ऑन द मेथड
दुरुस्त केलेली योग्य जोडी: कार्ल मार्क्स – दास कॅपिटल
२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) द्वंद्ववाद
उत्तर –
1. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला ‘द्वंद्ववाद’ असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.
2. दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धान्तांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही.
थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात.
(२) ॲनल्स प्रणाली
उत्तर –
1. राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली’ असे म्हणतात.
2. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे; तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे; असे मानणारी ॲनल्स प्रणाली’ फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
उत्तर –
1. इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने का इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
2. त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
3. इतिहासलेखनाच्या पुनर्विचार करण्यावर भर दिला. क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
(२) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
उत्तर –
1. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.
2. त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.
3. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ असे म्हटले आहे.
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर – युरोपातील महत्त्वाचे विचारवंत-
1. रेने देकार्त
2. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
3. व्हॉल्टेअर
4. लिओपॉल्ड व्हॉन रांके
५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
उत्तर – एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने ‘वर्गसंघर्षाचा सिद्धांत’ मांडला, त्याच्या मते –
1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
2. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
3. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो.
4. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो.
मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.
(२) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर – आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये
1. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
2. हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात, त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो.
3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.
4. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.
(३) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?
उत्तर –
1. स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.
2. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली.
3. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.
4. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले,
5. १९९० नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच ‘स्त्रीवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.
(४) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
उत्तर – लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहास लेखन कसे करावे,
याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते
1. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे.
2. इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते.
3. इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी,
4. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दयायला हवा.
Nidhi says
thank you 😊💕
Taniya says
Thank you ☺
Nidhu says
Thank you for your information 💕💗
Kalpesh chavan 18 says
thank you so much sir
Aditi says
Thanks
Riya says
This is very helpful Thankq so much 👍
Milind says
Thanks
Chavvi says
Thanks but add distribution
Ujjaini says
Thank you so much
Sajani says
Thank you so much sir ji
Anonymous says
thanks
Vaishu. says
Thank you 😘👍
Khushi Singh says
This is very useful and helpful thank you so much 😊
Shravani mahure says
Thank you 😄❣️
Uday patil says
Thank you sir🙏
Uday patil says
Thank you sir for my help🙏🙏🤗
Simran akare says
Thanku so much
Shravani says
Thank you very much
Vishwajit patil says
Thanks bhai
Mohit says
Thanks
Yash kawde says
Nice 🙂 work
Aditi says
Thank you so much 😊
Anjali says
Thank you sir 🙏☺️
Vaishnavi karkare 🩷 says
Thank you
Sayali says
thank you