भारतीय समाजाचा परिचय
Short Questions
1. प्राचीन भारतीय समाजाचा अभ्यास करण्याचा प्रमुख स्रोत कोणता आहे?
उत्तर:पुरातत्त्वीय पुरावे.
2. समाजशास्त्र कोणत्या शतकात युरोपमध्ये उदयाला आले?
उत्तर: १९व्या शतकात.
3. हडप्पा संस्कृतीचा कालखंड कोणता आहे?
उत्तर: इ.स.पू. २६०० ते १५००.
4. वैदिक काळात कोणत्या भाषेत ग्रंथांचे अध्ययन केले जात असे?
उत्तर: संस्कृत.
5. जैन धर्माचा मुख्य तत्त्व कोणता आहे?
उत्तर: अहिंसा.
6. बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे?
उत्तर: तिपिटक.
7. पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे?
उत्तर: अवेस्ता.
8. शीख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे?
उत्तर: श्री गुरुग्रंथ साहिब.
9. प्राचीन दक्षिण भारतात कोणता कालखंड प्रसिद्ध आहे?
उत्तर: संगम कालखंड.
10. सती बंदी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला?
उत्तर: १८२९.
11. हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला?
उत्तर: १९६१.
12. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेचे मूल्य कशाला म्हणतात?
उत्तर: सर्वधर्मसमभाव, म्हणजे सर्व धर्मांचा आदर करणे.
13. गौतम बुद्धांनी कोणत्या मार्गावर आधारित उपदेश केला?
उत्तर: मध्यममार्ग.
14. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर: राजा राममोहन रॉय.
15. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: डॉ. बी. आर. आंबेडकर.
Long Questions
1. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक श्रद्धा आणि आचार यांचे वैशिष्ट्य काय होते?
उत्तर: प्राचीन काळात हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचा प्रभाव होता, तर मध्ययुगात इस्लाम, खिश्चन, ज्यू आणि पारशी धर्मांचा प्रभाव वाढला. धार्मिक श्रद्धा आणि आचारांनी समाजजीवनाला आकार दिला, जसे की कर्मसिद्धांत आणि अहिंसेचे तत्त्व.
2. वैदिक काळातील शिक्षणपद्धती कशी होती?
उत्तर: वैदिक काळात गुरुकुलात संस्कृतमध्ये वेदांचे शिक्षण दिले जात असे. सर्व वर्गांना शिक्षणाचा हक्क होता, पण उत्तर वैदिक काळात स्त्रियांवर शिक्षणासाठी निर्बंध आले.
3. मध्ययुगीन भारतात स्त्रियांचे सामाजिक स्थान कसे होते?
उत्तर: मध्ययुगात बालविवाह आणि बहुपत्नीत्व यांसारख्या प्रथांमुळे स्त्रियांचे सामाजिक स्थान घसरले, शिक्षण आणि सामाजिक सहभाग कमी झाला. मात्र, जैन आणि बौद्ध परंपरेत काही स्त्रियांना भिक्खुणी म्हणून शिक्षण आणि सेवेच्या संधी मिळाल्या.
4. वसाहतकालीन भारतात कोणत्या सामाजिक सुधारणा झाल्या?
उत्तर: सती बंदी (१८२९), विधवा पुनर्विवाह (१८५६) आणि बालविवाहविरोधी कायदा (१९२९) यांसारख्या सुधारणांनी समाजात बदल घडवले. ब्रिटिश प्रशासनाने शिक्षण आणि कायद्यांमध्येही सुधारणा केल्या.
5. स्वातंत्र्योत्तर भारतात संविधानाने कोणत्या मूल्यांना प्राधान्य दिले?
उत्तर: भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभाव, समता आणि सामाजिक न्याय यांना प्राधान्य दिले. कलम ३७० रद्द करणे (२०१९) ही महत्त्वाची सुधारणा होती.
6.जैन आणि बौद्ध धर्माने भारतीय समाजावर कसा प्रभाव टाकला?
उत्तर: जैन आणि बौद्ध धर्मांनी अहिंसा, समता आणि नैतिक जीवनावर भर दिला. त्यांनी जातिव्यवस्थेला आव्हान देत सामाजिक सुधारणांना चालना दिली.
7. हडप्पा संस्कृतीतील नागरीकरणाची वैशिष्ट्ये कोणती होती?
उत्तर: हडप्पा संस्कृतीत नियोजित नगरे, जलवाहिन्या आणि लिपीचा वापर होता. ही संस्कृती भारतातील पहिली नागरी संस्कृती मानली जाते.
8. मध्ययुगीन भारतात इस्लामिक शिक्षणपद्धती कशी होती?
उत्तर: इस्लामिक शिक्षणात कुराण, हदिस आणि व्यवहारिक विषयांचा समावेश होता. मदरशांमध्ये संस्कृत आणि उपनिषदांचेही अध्ययन केले जात असे.
9. वसाहतकालीन काळात दळणवळण आणि संपर्क क्षेत्रात कोणते बदल झाले?
उत्तर: रेल्वे, रस्ते, टपाल आणि तार यांच्या उभारणीमुळे देशातील संपर्क सुधारला. मुअज कालव्यामुळे व्यापार वाढला आणि परदेशाशी संपर्क सुलभ झाला.
10. स्वातंत्र्योत्तर भारतात आर्थिक विकासासाठी कोणत्या योजना राबवल्या गेल्या?
उत्तर: १९५१ ते २०१७ दरम्यान पंचवार्षिक योजनांनी आर्थिक विकासाला चालना दिली. या योजनांनी शेती, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती केली.
Leave a Reply